चेन्नई कसोटीत जडेजाने टीपलेला अफलातून झेल

इशांत शर्माच्या लेग साईडच्या दिशेने जाणाऱया चेंडूवर बेअरस्टोने बॅट टाकली आणि चेंडू हवेत उडाला. मिड विकेटवर उभ्या असलेल्या जडेजाने थेट डीपवर धावत जाऊन बेअरस्टोचा अफलातून झेल टीपला. जडेजाने टीपलेला हा झेल मालिकेतील सर्वोत्कृष्ट असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत असून या जडेजाने टीपेलल्या झेलचा व्हिडिओ टीम इंडियाच्या फेसबुकपेजवर अपलोड करण्यात आला आहे. जडेजाच्या व्हिडिओला चांगली पसंती देखील मिळत आहे.

जडेजाने थेट डीप मिड विकेटवर धावत जाऊन बेअरस्टोचा अफलातून झेल टीपला तो क्षण