fbpx

मातोश्रीवर होणार रवींद्र गायकवाड यांची नाराजी दूर

टीम महाराष्ट्र देशा: उस्मानाबादचे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मातोश्रीवर दाखल झाले आहेत. उस्मानाबादमधून शिवसेनेने रवींद्र गायकवाड यांना डावलून ओमराजे निंबाळकर यांना तिकीट दिले आहे.

पक्षाच्या या निर्णयामुळे रवींद्र गायकवाड यांचे समर्थक चांगलेच नाराज झाले होते. रवींद्र गायकवाड हेही बंडाच्या तयारीत होते. निवडणुकीच्या तोंडावर बंड नको म्हणून पक्षातर्फे त्यांची दखल घेण्यात आली आहे.

पक्षानं तिकीट दिलेल्या ओमराजे निंबाळकर यांचा प्रचार करणार नाही, असा इशाराही रवींद्र गायकवाड यांच्या समर्थकांनी दिला होता. आज होणाऱ्या बैठकीत उद्धव ठाकरे हे रवींद्र गायकवाड यांची कशी समजूत घालतात हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.