राष्ट्रवादीने चर्चाकरून यादी जाहीर करायला हवी होती, बुलढाण्याची जागा न दिल्याने स्वाभिमानी नाराज

टीम महाराष्ट्र देशा: आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांशी आघाडी करणार होतो, कोणत्याही एका पक्षाशी नाही. त्यामुळे आम्ही मागणी करत असलेल्या बुलढाणा लोकसभेसाठी उमेदवार जाहीर करण्याआधी राष्ट्रवादीने चर्चा करायला हवी होती, म्हणत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आघाडीत सहभागी होण्यासाठी खा राजू शेट्टी यांनी हातकणंगले, बुलढाणा आणि वर्धा मतदारसंघाची मागणी केली आहे. यामध्ये आज राष्ट्रवादीने हातकणंगलेची जागा शेट्टी यांच्यासाठी सोडण्यात येत असल्याचे सांगितले आहे.

राष्ट्रवादीकडून बुलढाण्याच्या जागेवर राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे बुलढाण्यातून इच्छुक असणारे रविकांत तुपकर यांचा पत्ता कट झाल्याचं बोललं जातं आहे.

दरम्यान, स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्यासाठी मागण्यात आलेली बुलढाणा लोकसभा स्वाभिमानी संघटनेला मिळण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे राजू शेट्टी हे आता काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

1 Comment

Click here to post a comment