‘मंत्री ,आमदार ,खासदार यांच्या पगारावर उधळपट्टी केली जाते मग शेतकऱ्यांना मदत का केली जात नाही?’

'मंत्री ,आमदार ,खासदार यांच्या पगारावर उधळपट्टी केली जाते मग शेतकऱ्यांना मदत का केली जात नाही?'

मुंबई :राज्यात यावर्षी जून ते ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी 10 हजार कोटी रुपयांचं अर्थसहाय्य देण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. जिरायतीसाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर,तर बागायतीसाठी 15 हजार रुपये प्रति हेक्टर इतकी आर्थिक मदत दिली जाणार आहे.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी सरकारवर मदतीच्या मुद्द्यावरून टीका केली आहे. ते म्हणाले,  शेतकऱ्यांना  पैसे द्यायचे असतात तेव्हा यांच्याकडे पैसे नसतात तिजोरी रिकामी असते मग तुमची तिजोरी रिकामी आहे तर महागाई भत्ता देता कुठून मंत्री ,आमदार ,खासदार यांच्या पगार कधी थांबवलेला गेला नाही आहे आणि उधळपट्टी केली जाते या आमदार ,खासदार या सरकारी खर्चावर मग शेतकऱ्यांना मदत का केली जात नाही असा प्रश्न देखील त्यांनी सरकारला विचारला.

ही काही मदत सरकारने जाहीर केली आहे ती आम्हाला मान्य नाही आम्ही अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना सोबत घेऊन सरकारच्या छाताडावर आम्ही बसू परंतु २०१९ च्या शासन निर्णयांनुसार मदत घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असे तुपकर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या