खबरदार शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास बँक मॅनेजरला झोडपून काढणार

Ravikant-Tupkar

चिखली : राज्यामध्ये मान्सून दाखल झाल्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सर्व भागामध्ये शेतकऱ्यांची पेरणी करण्यासाठी लगभग उडाली आहे. आर्थिक अडचण दूर करण्यासाठी दरवर्षी शेतकऱ्यांकडून पिक कर्जासाठी बँकेकडे अर्ज केले जातात, कोरोनाच्या संकटामुळे पीक कर्जाच्या मागणीमध्ये वाढ झालीय. मात्र, सरकारकडून कर्ज वाटप करण्याचे आदेश असताना देखील बँकेकडून अडवणूक केली जाते. त्यामुळे यापुढे पिककर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या बँक आधिकऱ्याना झोडपून काढण्याचा गर्भित इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला.

पिककर्जासाठी शेतकरी बँकांचे उंबरठे झिजवत असताना बँकेकडून तालुक्यातील शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने तुपकर यांनी तालुक्यातील सहा बँकांना भेट दिली. यामध्ये केळवद स्टेट बँक, चिखली स्टेट बँक, चिखली सेंट्रल बँक, शेलसुर स्टेट बँक, अमडापुर स्टेट बँक, उंद्री स्टेट बँकेला भेटी देऊन पिककर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या बँक आधिकऱ्यांना झोडपून काढण्याचा गर्भित इशारा यावेळी दिला .

परस्थिती टाळण्यासाठी कर्नाटकसोबत मुख्यमंत्रीस्तरावर बैठक घ्या, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

विदर्भातील शेतकरी गेली अनेक वर्षांपासून आस्मानी सुलतानी संकटाचा मारा सहन करीत आहे त्यातच यावर्षी कोरोना महामारीचा मोठा फटका शेतकरी वर्गाला बसला आहे उत्पादीत केलेल्या शेतमालाला बाजार उपलब्ध नसल्याने मातीमोल भावाने शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकावा लागला तर फळ भाज्या तर फेकून द्याव्या लागल्या आहे. कर्ज माफी झाल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी पेरणीच्या खर्चासाठी बँकामध्ये गर्दी केली तर बँक मॅनेजरकडून शेतकऱ्यांची अगदी लहानलहान गोष्टीसाठी अडवणूक केली जात आहे.

चिखली येथील सेंट्रल बँक शेतकऱ्यांना नाहरकत प्रमानपत्राचे १०० रुपये भरून घेत असल्याने रविकांत तुपकर यांनी बँक मॅनेजरला चांगलेच धारेवर धरले दरम्यान वरिष्ठांसोबत चर्चा केल्यानंतर १९ जूनपासून नाहरकत प्रमाणपत्राचे पैसे घेणार नसल्याचे सांगितले तर उंद्री, अमडापूर, केळवद, चिखली व शेलसुर या स्टेट बँकेच्या शाखेचे पीक कर्ज वाटप अंत्यत धिम्या गतीने सुरू असून जिल्ह्यात कुठेच १०० रुपयांचे मुद्रांक उपलब्ध नसताना स्टेट बँक उंद्री दोन स्टँप पेपरची गरज असताना शेतकऱ्यांना तीन स्टँप पेपर मागत आहे.

फॉर्च्युनरवर पोकलेन कोसळून अपघात, शरद पवारांनी ताफा थांबवून केली आपुलकीने विचारपूस

बँकेसमोर शेतकऱ्यांच्या रांगा चीड आणणाऱ्या असल्याने तुपकर अधिकच आक्रमक झालेले पाहायला मिळाले दोन दिवसात सर्व शेतकऱ्यांचे पिकप्रकरणे मार्गी न लावल्यास आपण बँकेत येऊन बसू असा इशारा त्यांनी यावेळी बँक मॅनेजरला दिला. शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक द्या उद्धट वागूनक देणाऱ्या बँक मॅनेजरला झोडूपुन काढण्याचा इशारा सुद्धा त्यानी दिला.