‘सरकार मुडद्द्यावर राज्य करणार आहे का’ – रविकांत तुपकर

बुलडाणा: एका शेतकरी पुत्राने स्वतःचे सरण रचून आत्महत्या केलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी असून मन सुन्न करणारी आहे. याच मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. विविध क्षेत्रात काम करणार्‍या सगळ्या समाज घटकांना चिंतन करायला लावणारी ही बाब आहे राज्यकर्त्यांनी सुद्धा चिंतन केलं पाहिजे की शेतकऱ्यांची मुले आत्महत्येच्या दिशेने का चालली, असं तुपकर म्हणाले.

विदर्भ-मराठवाड्यामध्ये रोजगाराच्या संधी नाही, कुठे प्रक्रिया उद्योग नाही, सगळे उद्योग बुडाले आहे, शेती परवडत नाही, सोयाबीन-कापसाला भाव नाही, कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे, पावसाचे अलबेल वातावरण आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या पोराने जगायचं कसं असा प्रश्न यावेळी रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या: