जगात भारताला आदराचे स्थान निर्माण करून देणारा नेता हरवला- रविकांत तुपकर

बुलडाणा :  कवी मनाचा संवेदनशील माणूस, साहित्यिक, अमोघ वक्ता, प्रखर राष्ट्रभक्त् आणि विरोधकांनाही आपलेसा वाटणारा तसेच चुक झाल्यास वेळप्रसंगी स्वपक्षातील नेत्यांना राजधर्माची आठवण करून देणारा व आपल्या कतृत्वाने सर्वसामांन्यांची मने जिंकणारा नेता अशी ख्याती प्राप्त् असलेले भारतरत्न् स्व्. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जाण्याने एक पित्रुतुल्य् नेता हरवला. अशा शब्दात स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त् केल्या.

तुपकर पुढे म्हणाले की, स्व्. अटलबिहारी वाजपेयी यांनी जगभरात आदराचे स्थान निर्माण केले होते. भारतीय लोकशाहीच्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. त्यांनी खऱ्या अर्थाने गावांना शहराशी जोडण्याचे काम असो वा, शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून त्याची अंमलबजावणी करण्याचे काम अटलबिहारी वाजपेयी यांच्याच कार्यकाळात झाले. अशा हया नेत्याला देश कधीही विसरू शकणार नाही. अशा संवेदनशिल नेत्याच्या जाण्याने देशाची फार मोठी हानी झाली. ते देशातील करोडो तरुणांचे प्रेरणास्थान होते.

हिंदुत्वादी पक्षात काम करत असले तरीही ते सर्व विचारसरणींच्या विरोधी नेत्यांचा तितकाच सन्मान करीत होते. राजकारणाच्या पलिकडे जावून राष्ट्राच्या उन्नतीसाठीची त्यांची तळमळ फार मोठी होती. ज्यावेळी भाजपला कुणी विचारत नव्हते, तेव्हापासून पक्षविस्तरासाठी त्यांनी आयुष्य् झोकून दिले व त्यांच्यामुळेच आज भाजपला एकहाती सत्ता मिळवता आली. राजकारणी कसा असावा याचे ते आदर्श उदाहरण होते. त्यांचे नेतृत्व् अनेक पिढयांना प्रेरणा देत राहील. अशा शब्दात रविकांत तुपकर यांनी आपल्या भावना व्यक्त् केल्या.

अटलजी नंतर ज्यांच्या पाया पडावे अशी पावले सापडत नाहीत – रामदास फुटाणे

You might also like
Comments
Loading...