‘अजून किती शेतकऱ्यांचा जीव गेल्यानंतर मस्तीच्या गुर्मीत धूंद असलेल्या केंद्र सरकारला जाग येणार’?

ravikant tupakr

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवरील आंदोलनात महाराष्ट्रातील महिलेचा मृत्यू झाला आहे. सीताबाई रामदास तडवी असे या महिलेचे नाव आहे. त्या 56 वर्षांच्या होत्या. नंदूरबार जिल्ह्यातील अंबाबरी गावच्या रहिवासी असलेल्या सीताबाई या 16 जानेवारीपासून दिल्लीच्या सीमेवर शहाजान येथे आंदोलनाला बसल्या होत्या. कडाक्याच्या थंडीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते.

प्राप्त माहितीनुसार, दिल्लीच्या सीमेवर रक्त गोठवणारी कडाक्याची थंडी आहे. या थंडीमुळे सीताबाई तडवी यांचा मृत्यू झाला. सीताबाई यांना वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. सीताबाई यांचे पार्थीव त्यांच्या मूळ गावी (अंबाबरी) येथे आणण्यात येणार आहे. इथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

यावरून आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. रक्त गोठवणार्‍या थंडीत आपल्या जिवाची पर्वा न करता दिल्लीत केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. आपल्या महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्य़ातील अंबाबरी गावच्या शेतकरी महिला सीताबाई तडवी या १६ जानेवारीपासून दिल्लीतील शहारानपूर सीमेवर आंदोलन करीत होत्या. आज त्यांचा आंदोलनादरम्यान मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! आत्तापर्यंत अनेक शेतकर्‍यांनी आंदोलनादरम्यान आपला जीव गमावला आहे, अजून किती शेतकऱ्यांचा जीव गेल्यानंतर अहंकारात आणि मस्तीच्या गुर्मीत धूंद असलेल्या केंद्र सरकारला जाग येणार आहे..? असा घणाघात तुपकर यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या