fbpx

भाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर

जामखेड : भाजपवाल्यांना दिवसा काहीच करता येत नाही. मात्र नोटबंदी व कर्जमाफीसारखे निर्णय रात्रीच्या वेळी घेता येतात. याचाच अर्थ भाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते. म्हणून २०१९ च्या निवडणूकीत भाजपवाल्यांना रात्रीची मजा घेण्यासाठी कायमचे घरी पाठवा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जामखेड तालुक्यातील खर्डा येथे आयोजित करण्यात आलेल्या दुष्काळी परिषदेत बोलताना भाजपा सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला. पुढे बोलताना तुपकर म्हणाले की, मोदी सरकार सत्तेवर येण्याआधी शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या तातडीने मार्गी लावू, असे आम्हाला अश्वासन दिले गेले होते. म्हणून आम्ही भाजपसोबत युती केली होती. मात्र साडेचार वर्षे लोटत आली तरी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जाऊ लागले. सत्तेची ऊब जवळ असतानाही शेतकऱ्यांना  त्यांचा हक्क मिळावा याचसाठी सत्तेला लाथ मारून रस्त्यावरच्या लढाईत स्वाभिमानी शेतकरी संघटना मैदानात उतरली आहे असं देखील ते म्हणाले.

1 Comment

Click here to post a comment