शेतकऱ्यांनो भाजपच्या नेत्यांना गाव बंदी करा : रविकांत तुपकर

जळगाव  : पेरणीचे दिवस डोक्यावर आले, शेतकऱ्यांनी पेरणीसाठी तयारी सुरू केली मात्र अदयाप अनेक बँकांनी पिककर्ज वाटपाला सुरूवातही केली नाही. जिल्हयात फक्त् पाच टक्केच कर्ज वाटप झाले आहे. कागदपत्रांच्या त्रुटी दाखवून बँकेचे अधिकारी शेतकऱ्यांना हाकलून लावत आहेत. व शेतकऱ्यांचा अपमान करीत आहेत. अशा मग्रुर व मुजोर अधिकाऱ्यांना हिसका दाखवीण्यासाठी व शेतकऱ्यांना विनाविलंब पिक कर्ज व पिक विमा मिळावा या मागण्यांसाठी “स्वाभिमानी”चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात सोमवारी जळगाव जामोद येथे हजारो शेतकऱ्यांचा दणका मोर्चा निघाला. या विक्रमी मोर्चाने मात्र प्रशासन हादरून गेले होते. यावेळी झालेल्या जाहीर सभेत रविकांत तुपकर यांनी भाजप सरकारवर टिकेची झोड उठवत शेतकऱ्यांना पेरणी पुर्वी पिक कर्ज व पिक विम्याची रक्क्म न मिळाल्यास शेतकऱ्यांनो भाजप नेत्यांनाच गावबंदी करा असा खणखणीत इशारा दिला. त्यासाठी स्वाभिमानी तुमच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी सांगीतले.

Loading...

वरवट बकाल येथे रविकांत तुपकर यांचे आगमन होताच तरुणांच्या भव्य् मोटार सायकल रॅलीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. वरवट बकाल ते जळगाव जामोद अशी शेकडो मोटार सायकलची रॅली काढण्यात आली. रॅलीच्या समारोपानंतर मोर्चाला सुरूवात झाली. गाव खेडयातून आलेल्या शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी, तरुणांचा उत्साह व सरकारच्या विरोधात गगणभेदी घोषणाबाजीने जळगाव शहर दणाणून गेले होते.

शेतकऱ्यांना सरसकट कर्ज मुक्ती करून बँकांनी दाखल्याचे निकष न लावता नविन पिक कर्जाचे तात्काळ वाटप सुरू करा, ऑनलाईनच्या चालु-बंदच्या गोंधळामुळे पिक विमा न भरल्या गेलेल्या वंचित शेतकऱ्यांना पिकविम्याची निम्मे रक्क्म खात्यात जमा करा, शेतकऱ्यांच्या घरात पडून असलेल्या हरभरा व तुरीच्या शेवटच्या दाण्यापर्यंत खरेदी करा, 11 फेब्रुवारी 2018 रोजी झालेल्या गारपिटीने नुकसान झालेल्या व नुकसान भरपाईपासून वंचीत असलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दया, 16 फेब्रुवारी 2018 च्या शासन निर्णयानुसार गरजू लाभार्थ्यांना हक्काचे घरकुल दया, 140 गाव पाणी पुरवठा योजनेचे काम पारदर्शक करून खारपाण पटयातील गावांना पाणी पुरवठा योजनेतील पाणी मुबलक व मोफत द्या, किडणीच्या आजाराने मृत्यु झालेल्या मृतकांच्या कुटुंबाला 2 लाख रूपयाचे आर्थीक सहाय्य् दया, शेतकऱ्यांकडे पत संस्था, सावकारी व फायनांन्स् कडून घेतलेल्या कर्जाची कर्जमाफीत समावेश करा, बोंडअळीग्रस्त् शेतकऱ्यांना जाहीर केलेली हेक्टरी 37,500 रूपयाची मदत तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करा, शासन निर्णयानुसार 1/8/2017 पासूनचे व्याज बँकांनी वसुल करू नये या व इतर मागण्यांसाठी उपविभागीय कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता. स्थानिक कॉटन मार्केटवरून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व् स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले. भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत सदर मोर्चा उपविभागीय कार्यालयावर पोहचला.

मोर्चाला संबोधीत करतांना रविकांत तुपकर म्हणाले की, एकीकडे भाजप सरकार शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखविते प्रत्य्क्षात मात्र शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम सरकार करीत आहे. शेतमालाला भाव नाही, पिक विम्याची रक्क्म अदयाप शेतकऱ्यांना मिळाली नाही, संपूर्ण कर्जमुक्तीचे अजूनही भिजत घोंगडे आहे. शेतकऱ्यांची तुर व हरभरा अदयाप शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांजवळ पेरणीसाठी पैसा नाही. बँका शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहेत. अशावेळी शेतकऱ्यांना जायचे कोठे? असा सवाल उपस्थित करून जर हे सरकार शेतकऱ्यांना पिक कर्ज उपलब्ध् करून देण्यास अपयशी ठरत असेल तर या सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतीक अधिकार नाही. बँकांचे मुजोर अधिकारी यांच्याच आमदार व मंत्र्यांचे ऐकत नाहीत. पिक कर्जासाठी जर सत्तेतील लोकांनाच अधिकाऱ्यांशी भांडावं लागेत असेल, आंदोलन करावे लागत असेल तर सामान्य् लोकांनी न्याय मागण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ट्रमकढे जायचे काय? असा सवाल उपस्थित करून “कोठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा” अशी खिल्ली तुपकरांनी उडवली.

जिल्हा बँकेचा मलिदा खाण्यासाठी जर सर्वपक्षीय नेते एकत्र येत असतील तर, आपल्या हक्कासाठी आपण शेतकऱ्यांनी पक्ष बाजूला ठेवून सरकारच्या विरोधात लढा देण्यासाठी का एकत्र येवू नये? असा प्रश्नही उपस्थित शेतकरी बांधवांना केला. सत्तेवर येण्याअधी या सरकारने दिलेल्या एकाही अश्वासनाची पुर्तता केली नाही. चार वर्षात केवळ जनतेला मुर्ख बनविण्याचे काम यांनी केले. जाती जातीमध्ये भांडणे लावत लोकांचे लक्ष विचलीत करून यांनी चार वर्ष काढले. आता पुन्हा सत्ता मागण्यासाठी हे तुमच्या दारात येतील तेव्हा मात्र तुम्ही यांचा हिशोब चुकता करा असे सांगून शेतकऱ्यांच्या विम्याचे पैसे व पिक कर्ज विनाविलंब न दिल्यास आता भाजपच्या नेत्यांना गावबंदी करा असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले.

यावेळी मंचावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्क्र, विदयार्थी संघटनेचे पश्चिम विदर्भ प्रमुख राणा चंदन, विदर्भ संघटक बबनराव चेके, गिरीधर देशमुख, मनोज वाघ, नितिन पाचपोर, राम वानखेडे, अमोल बाहेकर, रोशन देशमुख,नितिन पाटील, विलास तराळे, मोहन पाटील, संतोष दाणे, प्रविण येणकर, संतोष तायडे, अनंता मानकर यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व हजारोंच्या संख्येनी शेतकरी बांधव उपस्थित होते.

माधुरीच्या घरी जाणारे अमित शाह भाउसाहेबांच्या घरी का गेले नाही …?
भाजपने 2019 च्या निवडणूकीवर डोळा ठेवून नट नटयांच्या घरी जाण्याचा सध्या सपाटा सुरू केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे माधुरी दिक्षीतच्या घरी जावून आले तर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे सलमान खानच्या घरी गेले होते. आपल्या जिल्हयाचे भुमिपुत्र, कृषीमंत्री भाउसाहेब फुंडकर यांचे नुकतेच निधन झाले. भाजप वाढविण्यासाठी भाउसाहेबांचे मोलाचे योगदान आहे. वेळप्रसंगी त्यांनी पक्ष वाढीसाठी दगड गोटे खाल्ले, अख्खी हयात त्यांनी भाजपध्ये घालवली. अशा पक्षाच्या एका प्रामाणीक शिलेदाराच्या निधनानंतर त्यांच्या घरी भेट देण्याऐवजी अमित शाह हे माधुरी दिक्षीतच्या घरी जातात. यावरूनच या नेत्यांची संवेदनशिलता कळते. जे पक्षाच्या नेत्यांचे होउ शकले नाही, ते शेतकऱ्यांचे काय भले करणार असा टोलाही तुपकरांनी लगावला व भाजप नेत्यांनी नट-नटयांच्या घरी जाण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या बांधावर यावे तरच शेतकऱ्यांचे दुख: समजेल असे सांगून अमित शाह हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून नरेंद्र मोदी, अमित शाह व राज्य् सरकारवर रविकांत तुपकर यांनी टीकेची झोड उठवली.

दणका मोर्चाला शेतकऱ्यांची रेकॉर्डब्रेक गर्दी
शेतकरी हिताचा एकही चांगला निर्णय न घेणाऱ्या भाजप सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांचा प्रचंड रोष आहे. त्याचा प्रत्य्य आजच्या स्वाभिमानीच्या दणका मोर्चावरून दिसून आला. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात झालेल्या या मोर्चात तालुक्यातील हजारो शेतकरी भर उन्हात सहभागी झाले होते. जळगाव जामोद शहरात अलीकडच्या काळात झालेल्या मोर्चापैकी स्वाभिमानीच्या या मोर्चाने रेकॉर्डब्रेक गर्दीचा उचांक गाठल्याने आजचा मोर्चा चर्चेचा विषय ठरला होता. रविकांत तुपकर यांच्या आक्रमक व खास वऱ्हाडी शैलीतील भाषणाने युवकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता. तर शेतकऱ्यांच्या व्यथा मांडतांना तुपकरांनी जे वास्त्व मांडले त्यामुळे मोर्चातील हजारो शेतकऱ्यांच्या डोळयात पाणी दिसत होते. या मोर्चाला तगडा पोलिस बंदोबस्त् होता. दरम्यान शहरात दणका मोर्चा चर्चेचा विषय ठरला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
महिला उपजिल्हाधिकाऱ्याने भाजप नेत्याच्या कानशिलात लगावली