कौशल्य दाखव अन्यथा घरचा रस्ता पकड, रवी शास्त्रींचा रिषभ पंतला इशारा

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रिषभ पंत याला इशारा दिला आहे. इथून पुढच्या सामन्यात चुका झाल्या तर संघातून बाहेर काढण्यात येणार असल्यच सांगितल आहे. गेले काही दिवस मैदानावर रिषभ पंत कडून वारंवार चुका होत आहेत. त्यामुळे संघ अडचणीत येत आहे. तसेच संघ अडचणीत असतानाही पंत गांभीर्याने खेळत नसल्याच निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशिक्षक शास्त्री यांनी पंतला कौशल्य दाखव अन्यथा घरचा रस्ता पकड, असा इशारा दिला आहे.

शास्त्री म्हणाले की, वेस्ट इंडिजमध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथील सामन्यात पंत पहिल्याच चेंडूवर आऊट झाला. त्याच्यासमोर कर्णधार विराट कोहली हा खेळपट्टीवर होता आणि भारतीय संघ धावांचा पाठलाग करत होता. त्यावेळी संघाला पंतच्या धावांची गरज होती. पण पंत पहिल्याच चेंडूवर आऊट झाला. त्यामुळे यापुढे जर पंत असाच खेळत राहीला तर त्याला संघात स्थान मिळणार नाही, असे शास्त्री म्हणाले.

पंतच्या गुणवत्तेबाबत शास्त्री म्हणाले की, पंतच्या गुणवत्तेबाबत आम्हाला काहीच शंका नाही. यापूर्वीच त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. पण पंतचे शॉट सिलेक्शन चुकताना पाहायला मिळते. सामन्यामध्ये जशी परिस्थिती आहे त्यानुसार प्रत्येकाने खेळ करायचा असतो, पण हे पंतला आतापर्यंत जमलेले नाही. कारण त्याने बऱ्याच वेळा संघाच्या अपेक्षांची पूर्ती केलेली नाही. त्यामुळे यापुढे जर पंत असाच खेळत राहीला तर नक्कीच त्याचे संघातील स्थान धोक्यात आहे.