“भाड में गया पिच; २० विकेट निकालने है”

blank

टीम महाराष्ट्र देशा : दक्षिण आफ्रिकेविरुध्द रांचीमध्ये झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम क्रिकेट कसोटीत भारतानं एक डाव आणि 202 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारतानं या मालिकेतही 3-0 असं निर्भेळ यश मिळवलं आहे. दोन सामन्यांमध्ये शतकी खेळी साकारणारा रोहित शर्मा मालिकावीर ठरला.

या विजयामुळे टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री अतिशय आनंदात दिसले. विशेषत: शास्त्रींना गोलंदाजांची कामगिरी अधिक आवडली. आम्ही खेळपट्टीचे समीकरण हटवू इच्छित होतो. आमची योजना २० बळी मिळवण्याची होती, आम्हाला खेळपट्टीशी काही देणेघेणे नव्हते. आम्ही तर म्हणतो, ‘पीच गेले उडत’ असं शास्त्रींनी म्हटलं आहे.

खेळपट्टी मुंबई, ऑकलंड, मेलबर्न किंवा कुठलीही असो, प्रतिस्पर्धी संघाचे २० गडी टिपणे हा आमचा पहिला उद्देश होता. त्यानंतर फलंदाजी तर आमची उत्तम दर्जाची होणार याचा आम्हाला विश्वास होताच. आणि त्यात जेव्हा तुमच्याकडे २० गडी बाद करणारे पाच गोलंदाज असतात, तेव्हा काळजीचं काही कारण नसतं”, असे रवी शास्त्री म्हणाले.

भारताने सामना जिंकत तब्बल ८४ वर्षांपूर्वीचा एका विक्रमाशी बरोबरी साधली. भारताने पहिल्यांदाच सलग दोन वेळा आफ्रिकेला फॉलो-ऑन दिला. यापूर्वी भारताने एका मालिकेत कोणत्याही संघाला दोनदा फॉलो-ऑन दिला नव्हता. त्यामुळे असा पराक्रम करण्याचा विक्रम भारताने केला. त्याचसोबत एका मालिकेत दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा दक्षिण आफ्रिकेला फॉलो-ऑन देण्याचीही केवळ दुसरीच घटना ठरलीय.

या आधी १९३५ साली ऑस्ट्रेलियाने असा पराक्रम केला होता. त्यांनी सलग तीन सामन्यांमध्ये फॉलो-ऑन देत सामने जिंकले होते. त्यानंतर आफ्रिकेला एकापेक्षा जास्त वेळा फॉलो-ऑन देण्याची किमया भारताने साधली.

महत्वाच्या बातम्या