टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्रींची निवड

वेबटीम : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी बीसीसीआयकडून रवी शास्त्रींची निवड करण्यात आली आहे. 2019च्या वर्ल्ड कप पर्यंत रवी शास्त्राr प्रशिक्षपदाची धुरा संभाळणार आहेत. श्रीलंका दौऱयापासून ते प्रशिक्षकपदाची जबाबदारी संभाळणार आहेत.

 

सोमवारी मुंबईतील बसीसीआयच्या मुख्यालयात क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी) सदस्यांनी प्रशिक्षकपदाच्या मुलाखाती घेतल्या होत्या. विरेंद्र सेहवाग, रवी शास्त्राr अन्य सहा जण या मुलाखतीत हजर होते. विराट कोहलीसोबत मतभेद झाल्यानंतर माजी मुख्य प्रशिक्षक व माजी भारतीय कर्णधार अनिल कुंबळे यांनी विंडीजविरूद्धच्या मालिकेपूर्वी राजीनामा दिला होता. त्यानंतर सोमावारी झालेल्या पत्रकार परिषदेत गांगुलीने आम्हला आणखी वेळ हवा आहे. कोहलीशी चर्चा केल्यानंतरच पशिक्षकाची निवड करण्यात येईल असे सांगितले होते. त्यानंतर अखेर रवी शास्त्रींची निवड करण्यात आली.