Share

Ravi Rana | बच्चू कडू यांनी देखील शब्द मागे घ्यावे – रवी राणा

Ravi Rana | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समर्थक बच्चू कडू (Bachhu Kadu) व अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यात वाद सुरू आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्यासाठी कडू यांनी पैसे घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता. यावर रवी राणा यांनी माफी मागावी असे कडू म्हणाले होते. दोघांमधला वाद विकोपाला गेल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राणा आणि कडू यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर यासंदर्भात रवी राणा यांनी एक वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले रवी राणा (Ravi Rana)

रवी राणा यांनी आपले शब्द मागे घेतले आहे. माझ्याकडून काही बोललं गेलं असेल तर, शब्द परत घेतो. माझ्यासाठी हा विषय संपला आहे, असं रवी राणा यांनी म्हटलं. रवी राणा यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

विचारांमध्ये मतभेद होत असतात. बच्च कडू आणि मी सरकारबरोबर आहे. महाराष्ट्रात जनेतच्या विकास, उन्नती आणि न्याय देण्यासाठी शिंदे-फडणवीस आलं आहे. अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी काही विकास केला नाही, तो तीन महिन्यांत या सरकारने केला. त्यामुळे हा विषय मी संपवत आहे. माझ्या वक्तव्यानंतर मंत्री अथवा आमदार दुखावले असतील, तर दिलगीरी व्यक्त करतो, असं राणा यांनी म्हटलं

पुढे बोलताना त्यांनी असंही म्हटलं की, मी माझे शब्द मागे घेत आहे. परंतू बच्चू कडू यांनी देखील त्यांनी बोललेले अपशब्द मागे घेतील, अशी अपेक्षा आहे. रवी राणा यांच्या या वक्तव्यावर बच्चू कडू काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

Ravi Rana | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समर्थक बच्चू कडू …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now