मुंबई : शिवसेनेचा आज ऐतिहासिक दसरा मेळावा होत आहे. यावेळी ही मेळावा दोन ठिकाणी होत आहे. एक उद्धव ठाकरे गटाकडून तर दुसरा एकनाथ शिंदे गटाचा. शिवाजी पार्कमध्ये उद्धव गटाचा मेळावा होत आहे. त्याचवेळी वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात शिंदे गटाचा मेळावा होत आहे. दसरा मेळाव्यात शिवसेना आपली ताकद दाखवत आहे. दोन्ही गटाच्या नेत्यांनी ऐकमेकांवर टीका केली. तसेच यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. आता उद्धव ठाकरेंच्या या मेळाव्यावर अपक्ष आमदार रवी राणा यांनी टीका आहे.
नेमकं काय म्हणाले रवी राणा ?
रवी राणा हे यावेळी अमरावतीत बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्या सभेवर बोलताना रवी राणा म्हणाले कि, उद्धव ठाकरे यांची शिवाजी पार्कवरील सभा म्हणजे फुसका बार आहे, अशा शब्दांत रवी राणा यांनी टीका केलीये. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विचारधारा आपल्यामध्ये आणली असल्यामुळे त्यांना हा देखावा करावा लागतोय, असं देखील त्यांनी म्हटलंय. बाळासाहेबांच्या विचारधारेचा विसर पडल्यामुळे शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना मोठा झटका दिलाय, असं आमदार रवी राणा यांनी म्हटलं.
तसेच पुढे बोलताना राणा म्हणाले कि, हिंदुत्त्वाचं नाव घेऊन, हिंदू विचारांची दिशाभूल ठाकरे करत असल्याचा आरोप रवी राणा यांनी केलाय. हिंदुत्वाचा देखावा करण्याची गरज उद्धव ठाकरेंना का पडतेय, याचा विचार त्यांनी करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. उद्धव ठाकरेंना आता हिंदुत्व आठवलं, हे त्यांचं दुर्भाग्य आहे, असंही ते म्हणाले.
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आणि उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधू जयदेव ठाकरे शिंदे गटामध्ये दाखल झाले आहेत. बीकेसीवर सुरु असलेल्या दसरा मेळ्याला जयदेव ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी आपण शिंदे गटात असल्याचेही त्यांनी सांगितले. निहार ठाकरे यांच्यानंतर जयदेव ठाकरे यांनीही शिंदे गटाची वाट धरल्यामुळे हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जातोय.
महत्वाच्या बातम्या :
- Jaidev Thackeray | सर्व बरखास्त करा, पुन्हा निवडणूक घ्या, राज्यात शिंदे राज्य येऊ द्या; जयदेव ठाकरेंचे शिंदेंच्या मंचावरून आवाहन
- Eknath Shinde | “आम्ही गद्दारी केली नाही, तर…”; एकनाथ शिंदेंचं शिवसेनेला प्रत्युत्तर
- Eknath Shinde । मुख्यमंत्रीपद घेताना तुम्हाला लाज वाटायला हवी होती; एकनाथ शिंदे यांचा घणाघात
- Uddhav Thackeray | “मोहन भागवतांनी हिंदूत्व सोडलं की,…”; उद्धव ठाकरेंचा मोहन भागवतांवर हल्ला
- Eknath Shinde | “त्याला हार्ट अटॅक आला असता” ; एकनाथ शिंदेंनी सांगितला उद्धव ठाकरेंसोबतचा ‘तो’ किस्सा