मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याच्या भूमिकेला खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी समर्थन केले आहे. त्यातच राणा दांपत्यानी आज २३ एप्रिलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला आहे. मात्र त्यापूर्वीच शिवसैनिकांनी राणा दांपत्याच्या खार परिसरातील घराबाहेर जाम ठोकला आहे.
पोलिसांनी राणा दाम्पत्याच्या इमारतीकडे जाणारा रस्ता बॅरिकेटस लावून बंद केला होता. मात्र, शिवसैनिक या बॅरिकेटसवर चढले आणि राणा दांपत्याच्या घराच्या दिशेने चाल करून गेले आहेत. तर दुसरीकडे रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना पुढे करत आमच्या घराबाहेर शिवसैनिकांना पाठवले असल्याचे म्हटले आहे. उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून महाराष्ट्राला शनी लागला आहे. त्यामुळे राज्याच्या सुख शांतीसाठी आज मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठन करणारच असा इशारा रवी राणा यांनी दिला आहे.
तसेच बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे शिवसैनिक असते तर आम्हाला हनुमान चालीसा वाचू दिली असती असा टोलाही रवी राणा यांनी लगावला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात उन्नती झाली पाहिजे, शांती नांदली पाहिजे हा आमचा हेतू आहे. त्याला हा विरोध होतोय. मुख्यमंत्री सत्तेचा दुरुपयोग करत आहेत. हे बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसैनिक नाहीत. असे रवी राणा यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- राणांनी कुणाची तरी सुपारी घेतली असेल- दिलीप वळसे पाटील
- उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून महाराष्ट्राला शनी लागला; रवी राणा आक्रमक
- “हिंमत असेल तर खाली या”, ‘हनुमान चालीसा’ वाद पेटला; राणांच्या इमारतीसमोर शिवसैनिकांची घोषणाबाजी
- “मोहित कंबोज यांच्यावरील हल्ला म्हणजे डरपोक लोकांनी…”, देवेंद्र फडणवीसांचा संताप
- भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला; ‘मातोश्री’ समोर घडली घटना