Rana-Kadu | मुंबई : प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार आणि एकनाथ शिंदे समर्थक बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि स्वाभीमान पार्टीचे रवी राणा (Ravi Rana) यांच्यातील वाद जोरदार पेटला होता. त्यांचा वाद मिटवण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मध्यस्ती करत दोघांनाही काल वर्षा वर भेटायला बोलवलं होतं. या भेटीमध्ये नक्की वाद मिटला का नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, शिंदे यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
तब्बल अडीच तास वर्षा बंगल्यावर झालेल्या या चर्चेत तोडगा निघाल्याची शक्यता आहे. एकमेकांविरुद्ध जाहीर वाच्यता न करता शिंदे आणि फडणवीस यांच्याशी चर्चा करून मार्ग काढावा, असं या चर्चेत ठरलं आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना, समोरासमोर चर्चा झाली नसल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. तसेच या बैठकीत चर्चा सकारात्मक झाली असून ‘हम साथ साथ है, हम दोस्त है’ अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दूरध्वनीवरून दिली आहे. मात्र माध्यमांसमोर बोलण्यास उपमुख्यमंत्री फडणवीस आणि आमदार रवी राणा यांनी टाळलं आहे.
रवी राणा (Ravi Rana) यांनी बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्यावर शिंदे गटासोबत गुवाहाटीला जाण्यासाठी ५० खोके घेतल्याचा आरोप केला होता. यानंतर रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वादाला सुरवात झाली. मात्र आता हा वाद एवढा वाढला कि मिटण्याचं नाव घेत नाही. त्यानंतर बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेत रवी राणा यांनी माझ्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे द्यावेत, असे आव्हान दिले होते.
तसेच आता 1 नोव्हेंबरपर्यंत या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं तर मोठा बॉम्बच फोडणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी रवी राणा यांना दिला आहे. बॉम्ब कुठे आणि कसा फोडायचा हे आपल्याला बरोबर माहीत असल्याचं ते म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या :
- Shahajibapu Patil | ‘कसला मर्द’ म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंना शहाजीबापू पाटील यांनी दिलं उत्तर, म्हणाले…
- Gujrat | धक्कादायक! गुजरातमध्ये पूल कोसळला, १२० जणांचा मृत्यू तर अनेक जण बेपत्ता
- IND vs SA । केएल राहुल पुन्हा एकदा ठरला फ्लॉप, फॅन्सने सोशल मीडियावर केलं ट्रोल
- IND vs SA । दक्षिण आफ्रिकेचा भारतावर 5 गडी राखून विजय
- Bachhu Kadu । नाव बच्चू असंल तरी आडनाव कडू आहे हे लक्षात घ्या; बच्चू कडूंचा इशारा