“मी घटनास्थळी नसताना माझ्यावर गुन्हा”- आमदार रवी राणा

मुंबई: अमरावतीच्या महापालिका आयुक्तांवर आमदार रवी राणा यांच्या समर्थकांनी शाईफेक केल्यानंतर राणावर 307 आणि 353चा गुन्हा दाखल करण्यात आला. रवी राणा यांनी आज विधानसभेत अमरावती पोलिसांनी केलेल्या कारवाईचा राज्य सरकारवर आरोप केला. पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत राणा म्हणाले की, माझ्याकडे याचे पुरावे असून मी खोटे बोलत असेल तर मला सभागृहात फाशी द्या. या प्रकरणी राणा यांनी थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर आरोप केले. मी घटनास्थळी नसताना आणि दिल्लीत असताना माझ्यावर गुन्हा दाखल केला. मी घरी नसताना माझ्या घरी १००-१५० पोलीस आले होते, ज्यामुळे माझ्या घरच्यानाही त्रास झाला. असही राणा म्हणाले

राणा म्हणाले की, मध्यरात्री दीडशे पोलिस माझ्या घरात घुसले. पोलिसांनी वृद्ध आई-वडिलांची पर्वा न करता घरावर धाड टाकली. माझ्यावरील आरोप राजकीय हेतूने करण्यात आले आहेत. मला अटक करण्यासाठी सरकारकडून खूप दबाव होता, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत आणि मी खोटे बोलत असेल तर मला या सभागृहात फाशी द्या, असे राणा म्हणाले. पत्नी खासदार नवनीत राणा यांना ताब्यात घेऊन त्यांचा अपमान केल्याचा आरोपही राणा यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या: