‘सीक्रेट ऑफ लव्ह’ चित्रपटात ओशोची भूमिका साकारणार ‘हा’ भाजप खासदार

osho

नवी दिल्ली : आचार्य रजनीश यांचे अनुयायी संपूर्ण जगभरात आहेत. आचार्य रजनीश हे जगभर ओशो म्हणून ओळखले जातात. ओशोवर बऱ्याच डॉक्युमेंट्रीज तयार करण्यात आल्या आहेत मात्र आता ओशोच्या आयुष्यावरील चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ओशोची भूमिका भोजपुरी अभिनेता भाजप खासदार रवी किशन साकारणार आहे.

ओशोच्या जीवनावर तयार होणाऱ्या या चित्रपटाचे नाव आहे ‘सीक्रेट ऑफ लव्ह’. या चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश एस कुमार यांनी केले आहे. हा चित्रपट आचार्य रजनीश यांच्या जीवनावर आधारित आहे आणि रजनीश ओशो होण्याची कथा पडद्यावर दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय रजनीशची विचारसरणी,वेगवेगळ्या सरकार सोबत असणारे त्यांचे मतभेदयासह विविध पैलू या चित्रपटात दाखविण्यात येणार आहेत.

रवी किशन म्हणाले, ‘जेव्हा तुम्ही अशा व्यक्तीची व्यक्तिरेखा साकारता जी व्यक्ती केवळ वादग्रस्तच नसते तर त्याचे लाखो अनुयायी देखील असतात. अशा वेळी जबाबदारी तुमच्यावर वाढते. या पात्रामध्ये जाण्यासाठी मी ओशोची अनेक पुस्तके वाचली आहेत.यात दिग्दर्शकानेही खूप योगदान दिले आहे. यामुळे गोष्टी सुलभ झाल्या आहेत. तरीही आम्ही काळजी घेतली आणि प्रत्येक पैलू समजून घेतला आणि त्यानंतर त्यावर काम केले.

पुढे बोलतांना रवि किशन म्हणाला, ‘जेव्हा मी दिग्दर्शक रितेशला विचारले तेव्हा त्याने या भूमिकेसाठी माझाच का विचार केला ? यावर रितेश म्हणाला की माझे डोळे जास्त ओशोसारखे आहेत. ओशोच्या गेटअपमध्ये त्याने माझे छायाचित्रही काढले तेव्हा रितेशला दोघांमध्ये बरीच समानता आढळली.

महत्वाच्या बातम्या