रवी जाधवच्या न्यूडला इफ्फी मधून वगळले.

ravi jadhav

टीम महाराष्ट्र देशा  –  इफ्फी हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या महिन्याच्या अखेरीस गोव्यात पार पडणार आहे. मात्र या महोत्सवातून दिग्दर्शक रवी जाधव यांचा ‘न्यूड’ हा चित्रपट वगळण्यात आला आहे. रवी जाधवच्या ‘न्यूड’ला ओपनिंग चित्रपटाचा बहुमानही मिळाला होता. न्यूड मॉडेल असलेल्या एका महिलेचा जगण्यासाठीचा संघर्ष यात रेखाटण्यात आला आहे. मात्र, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने शुक्रवारी अंतिम यादी जाहीर केली, ज्यामध्ये या दोन्ही चित्रपटांचा समावेश नव्हता.

दोन्ही चित्रपटांच्या नावावर आक्षेप घेत त्यांनी हा निर्णय घेतल्याचं कळतंय. महोत्सवात दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटांच्या अंतिम यादीतून ‘न्यूड’ आणि ‘एस दुर्गा’ हे दोन चित्रपट वगळण्याचा निर्णय केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने घेतला आहे. विशेष म्हणजे परीक्षकांना कोणतीही पूर्वसूचना न देता हा निर्णय घेण्यात आला.
इफ्फीच्या इंडियन पॅनारोमा सेक्शनच्या १३ परीक्षकांनी मिळून २६ चित्रपटांपैकी ‘न्यूड’ आणि ‘एस दुर्गा’ हे चित्रपट निवडले होते.

Loading...

न्यूड ऐवजी विनोद काप्रीचा ‘पीहू’ हा चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणार असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले. या निर्णयाविरोधात परीक्षकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. ‘मंत्रालयाने ‘न्यूड’ हा चित्रपट वगळल्याचे कारण आम्हाला सांगावे आणि त्याऐवजी दुसरा चित्रपट निवडण्याची परवानगी आम्हाला द्यावी,’ असे परीक्षकांनी ई-मेलद्वारे मंत्रालयाला कळवले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'