केंद्रातील ‘हा’ मंत्री निघाला औस्ट्रेलिया दौऱ्यावर

टीम महाराष्ट्र देशा : केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखालील एक उच्चस्तरिय शिष्टमंडळ शनिवारी ऑस्ट्रेलियाला रवाना झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘ग्राहक देवो भव’ या मंत्रावर देशातील ग्राहकांच्या सर्व हक्कांचे संरक्षण करणे आमचे प्राधान्य आहे. संसदेने मंजूर केलेला ग्राहक संरक्षण कायदा 2019 ही सर्व अन्यायकारक व्यापार पद्धतींपासून ग्राहकांना संरक्षण देण्याच्या दृष्टीने मोठी झेप आहे. हे विधेयक संसदेने अगोदरच मंजूर केले असले तरी सध्या नियम व कायदे तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करणारे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

“या प्रक्रियेत ऑस्ट्रेलियन-भारत परिषद आणि ग्राहक व्यवहार विभाग अतिशय लक्षपूर्वक काम करत आहे. या प्रकल्पातील आमचे मूळ उद्दीष्ट आहे की या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पद्धती समजून घेणे आणि नवीन ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे नियम आणि कायदेतून अधिक बळकट करणे जे या देशातील ग्राहकांना अधिक सामर्थ्यवान आणि स्वावलंबी बनवेल. मला खात्री आहे की एआयसी आणि भारत सरकार या दोघांनी घेतलेल्या या सहकार्याने केलेल्या प्रयत्नांचे उत्कृष्ट परिणाम होतील जे ग्राहकांचे हित साधतील, असे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले.

भारत सरकार आणि ऑस्ट्रेलिया कौन्सिलच्या (एआयसी) अर्थसहाय्य आणि केंद्र सरकारचा ग्राहक व्यवहार विभाग, केंद्र सरकार, यांच्या सहाय्याने सिडनी विद्यापीठाने ऑस्ट्रेलिया-भारत सहयोगी ग्राहक संरक्षण प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प चार टप्प्यात राबविला जाईल.

महत्वाच्या बातम्या