हातावर पोळी, चटणी घेऊन रावसाहेब दानवेंनी केली न्याहरी

raosaheb danve

राजूर: जालना लोकसभा मतदारसंघातून सलग ४ वेळा निवडून येणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे गावाकडील व्यक्तीमत्व म्हणून चर्चेत असतात. गावाकडील बोलीभाषा, तसेच मातीतला माणूस म्हणून त्यांची जालना लोकसभा मतदार संघात ओळख आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना अपशब्द वापरले म्हणून रावसाहेब दानवे यांना लक्ष करण्यात आले होते.

राज्य सरकारने एवढी तूर खरेदी केली, तरी रडतात (…) अशा शब्दात रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं होत. आता मात्र त्यांनी शेतकऱ्यांप्रती सहानभूती व्यक्त केली आहे. यामध्ये राजकीय स्वार्थ आहे का? अशी सुद्धा चर्चा सुरु आहे. फक्त निवडणुका जवळ आल्या कि राजकीय नेत्यांना चटणी,पोळी ची आठवण येते. अशातला प्रकार म्हणून दानवे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Loading...

रावसाहेब दानवे आता चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, एका सांस्कृतिक सभा मंडपाचे भूमिपूज करण्यासाठी दानवे शुक्रवारी राजूर जवळील जानेफळ या मतदारसंघातील गावात गेले होते, दरम्यान भूमिपूजन झाल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना शेजारीच असलेल्या शेतात न्याहरी करू म्हणत नेले. मात्र रावसाहेबांनी शेतात गेल्यावर कुठे आहे न्याहरी, द्या पटकन… म्हणत ‘पोळी आणि चटणी’ हातावर घेतली आणि उभ्यानेच खाल्ली. त्यानंतर घोटभर पाणी पिऊन दानवे पुढच्या कार्यक्रमाला निघून गेले.

(रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना अपशब्द वापरले होते. तेव्हा हा व्हिडियो व्हायरल झाला होता)

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
उद्धवची आणि संज्याची औकात काढली त्याबद्दल उदयनराजेंच अभिनंदन:निलेश राणे
संज्या म्हणजे लुक्का;संज्या राऊत म्हणजे 'पिसाळलेला कुत्रा':निलेश राणे
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
'अजित पवार हे सध्याच्या मंत्रिमंडळातील अत्यंत कार्यक्षम मंत्री असून ते  कामाला वाघ आहेत'
नितेश राणेंची जीभ घसरली संजय राऊतांवर केली अश्लाघ्य भाषेत टीका
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
'हा देश मोदी आणि अमित शाह यांच्या बापाचा नाही'
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का