‘राऊतांना सगळे दिसते, ते तर महाभारतातील संजय’, चंद्रकांत पाटलांचा टोला

मुंबई : राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे. याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. दीड वर्षांपासून हे पद रिक्त आहे. महिला अत्याचाराच्या घटना राज्यामध्ये वाढत असताना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे.

परंतू राज्यात महिला आयोग अध्यक्षपद रिक्त असताना चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला गांभीर्याने घेऊ नये असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत केले होते. महाविकास आघाडीच्या महिला काम करत असल्याचे राऊत यांनी म्हटलं आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे. ‘महाविकास आघाडीच्या महिला अदृष्यपणे काम करताहेत. सामान्य नागरिकांना दिसत नाही. परंतू संजय राऊत हे महाभारतातील संजय आहेत, त्यामुळे धृतराष्ट्राला जे दिसत नाही ते त्यांना दिसते असा खोचक टोला पाटील यांनी लगावला आहे.

पाटील म्हणाले, ‘महिला नेत्या काम करत आहे ते त्यांना दिसतं कारण अदृष्य काम आहे ना. त्यामुळे त्यांना अदृष्य डोळे आहेत. पण आम्ही जी सामान्य माणसे आहोत ज्यांना सामान्य डोळे आहेत. सामान्य माणसांना दिसत नाही म्हणून म्हटले संजय राऊत महाभारतातले संजय आहेत. त्यामुळे त्यांना सगळे दिसतं. धृतराष्ट्राला जे दिसत नाही ते राऊतांना दिसते त्यामुळे फार मोठे व्यक्तिमत्त्व आहे असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या