वीज बिलाबाबत कलाकारांनी बुलंद केला आवाज, राऊत म्हणाले, बिल हप्त्यात भरा पण भराच

मुंबई : एकीकडे लॉकडाउनमुळे सर्वसामान्य आर्थिक संकटात सापडले असताना अवाच्या सवा दराने वीज बिल येत असल्याने महावितरणविरोधात राज्यभरात संताप आहे. वाढीव वीज बिलाचा फटका फक्त सर्वसामान्यच नाही तर सेलिब्रेटींनाही बसत असल्याचं समोर आलं आहे.

प्लाझ्मा थेरपीचा व्यापक प्रमाणात प्रयोग करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य – मुख्यमंत्री

अभिनेत्री रेणुका शहाणे हिने वीज बिलावर संताप व्यक्त केला आहे. अचानक वीज बिलाचा आकडा इतका फुगला कसा? असा सवाल सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने केला आहे. रेणुकाने ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.

‘मे महिन्यात माझे लाईट बिल ५५१० रुपये होते. त्यानंतर जून महिन्याचे २९,७०० रुपये आले. या महिन्याच्या बिलामध्ये मे आणि जूनचे एकत्र बिल देण्यात आले आहे. तुम्ही मे महिन्याचे बिल १८०८० रुपये दाखवले आहे. पण माझे बिल ५५१० रुपयांवरुन १८०८० रुपये कसे झाले?, असा सवाल तिने केला आहे. तिच्या या ट्विटवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने देखील वीजबिलाचा 36 हजारांचा आकडा पाहून संताप व्यक्त केला होता. तापसीने आपल्या ट्विटमध्ये आधीच्या महिन्यांच्या वीज बिलाचे फोटोही जोडून भरमसाट वीज बिल आलं असल्याचं सांगितलं आहे.

सोलापुरात ९३ वर्षांच्या आजी झाल्या कोरोनामुक्त

कलाकारांच्या तक्रारीवर महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत बिलात कोणतीही फसवणूक झालेली नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे बिल हप्त्यात भरा, असं नितीन राऊत यावेळी म्हणाले. राऊत म्हणाले की, विज बिलाबाबत फसवणूक होत नाही. वास्तवात महावितरणाला सुमारे 3500 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. जे लोक त्यांच्या बिलाचे अतिरिक्‍त मूल्य घेतल्याबद्दल तक्रार करतात, ते बिल ऑनलाईन तपासू शकतात आणि हप्ते भरण्याचा पर्याय घेऊ शकतात. त्यांना संपूर्ण रक्कम एकदाच देण्याची गरज नाही. यासंदर्भात विभागाकडून वीजपुरवठा बंद करण्यात येणार नाही.