राऊतांनी मोदींचे कौतुक केलेले काँग्रेसला रुचेना; ‘सर्टिफिकेट देणारे राऊत कोण?’

अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर, राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. या भेटीनंतर दोनच दिवसांत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नरेंद्र मोदी हे देशातील आणि भाजपाचे सर्वात मोठे नेते आहेत. मोदींमुळे गेल्या सात वर्षात भाजपला राष्ट्रीय पातळीवर मोठं यश मिळालंय, असेही राऊत यांनी सांगितले.

मात्र, हे कौतूक महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला रुचलेले नाहीये. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज अमरावतीमध्ये राऊतांनी केलेल्या कौतुकावर आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्टिफिकेट देणारे संजय राऊत कोण आहेत? असा सवाल पटोले यांनी केला. संजय राऊत यांना सर्टिफिकेट देण्याची जबाबदारी राज्याच्या नागरिकांनी दिली की देशाच्या असंही पटोले म्हणाले आहेत.

पटोले म्हणाले, पंतप्रधानपद हे देशाचं सर्वोच्च पद आहे. पण नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची गरिमा संपविली आहे. देशातील अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालीत. तीन काळे कायदे लागू करुन शेतकऱ्यांना संपवण्याची सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळं मोदींना पदाच्या खाली खेचण्याचा आणि भाजपला समूळ नष्ठ करायचा निर्णय नागरिकांनी घेतला आहे. म्हणून कोण काय सर्टिफिकेट देतं ते महत्त्वाचं नाही. लोकशाहीत जनता मोठी असते अशी अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

काँग्रेस राज्यात स्वबळावरच लढणार
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पवारांच्या ‘ऐकी’च्या नाऱ्यालाच सुरुंग लावला आहे. शरद पवार काय म्हणालेत हे आपल्याला ठावूक नाही. मात्र, आपल्या काँग्रेस पक्षाची भूमिका आपणच जाहीर करणार असल्याचं पटोले यांनी अकोला येथे निक्षून सांगितलं. पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस पक्ष राज्यात स्वबळावरच लढणार असल्याचं ते म्हणालेत. यासोबतच 2024 मध्ये काँग्रेस हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष राहणार असल्याचं भाकीत केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP