‘राऊतांनी राज्यपालांचा, ‘धोतराचा’ अपमान केला’ हिंदू धर्माची माफी मागावी’; नितेश राणे

Sanjay Raut

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनातील आग्रलेखात राज्यपालांवर टीका केली आहे, ‘दिल्लीत सत्ता आलेल्या पक्षांची सरकारे ज्या राज्यांमध्ये नाहीत त्या राज्यांत ते मदमस्त उधळलेल्या हत्तीचाच ‘रोल’ अदा करतात अशा हत्तींचे माहुत दिल्लीत बसून नियंत्रण करीत असतात. हत्तीच्या पायाखाली लोकशाही, तुमचीच धोतरे पेटतील,’ अशी टीका केली आहे. त्यावर नितेश राणे यांनी दै. सामनाचा उल्लेख दै. ‘बाबर’ असा करत राऊतांवर निशाना साधला आहे.

संजय राऊत सामनातील आग्रलेखात म्हणाले, महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील, राज्यपाल हे फक्त सरकारी पैशांवर पोसले जाणारे हत्ती नाहीत, दिल्लीत सत्ता असलेल्या पक्षंची सरकारे ज्या राज्यांमध्ये नाहीत त्या राज्याांत ते मदमस्त उधळलेल्या हत्तीचाच रोल अदा करतात व अशा हत्तींचे माहुत दिल्लीत बसून नियंत्रण करीत असतात. त्याच हत्तीच्या पायाखाली लोकशाही घटना, कायदा, राजकीय संस्कृती तुडवत वेगळे पायंडे पाडले जात असतात.

केंद्राचे सरकार, पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे नेते असतात, मग राज्यातील सरकारे भले त्यांना मानणाऱ्या राजकीय पक्षाची नसोत, त्या राज्यांना अस्थिर करणे म्हणजे राष्ट्रीय एकतेस चूड लावण्यासारखे आहे, महाराष्ट्रातील घडामोडी हा चूड लावण्याचाच प्रकार आहे. अर्थात, महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील हे विसरु नका. अशी टिका राऊतांनी केली आहे.

या आग्रलेखावर टीका करताना नितेश राणे सामनाचा उल्लेख ‘बाबर’ असा करत म्हणाले, हिंदू धर्माचा अपमाण करण्याचे मुखपत्र म्हणजे सामना झाले आहे. आज त्यांच्या आग्रलेखामध्ये राज्यपालांबाबत अपमाणास्पद शब्द वापरले आहेत. हिंदू धर्माचे प्रतिक त्याचबरोबर शेतकरी, वारकरी आणि कष्टकरी लोकांचे प्रतिक म्हणजे धोतर असतं! आणि त्या धोतराचा अपमाण करण्याचे काम सामनातून झाले आहे. गोल टोपीच्या प्रेमामध्ये ही शिवसेना आणि सामना एवढा आहारी गेला आहे, की त्यांना समस्त हिंदू धर्माचा अपमानही दिसत नाही. त्या आग्रलेखामध्ये तुम्ही भाजपच्या महिलांचा मनोबल कमी करु शकत नाहीत. कारण त्या जीजाऊच्या लेकी आहेत. पण येणाऱ्या दिवसांमध्ये एक आई आपल्या मुलाला न्याय देण्यासाठी किती टोकाला जाऊ शकते, हे राऊतांना कळेल समस्त हिंदू धर्माची माफी मागावी अन्यथा हिंदू धर्म कोणत्या टोकाला जाऊ शकतो हेत्यांना कळेल. अशी टिका नितेश राणे म्हणाले.

पुढे राऊत भाजपा महिला नेत्यांवर टीका करताना लिहीतात, राजभवनाच्या संवेदना मरुन पडल्या आहेत? महाराष्ट्रातील भाजपचे महिला महामंडळही महिलांवरील अन्याय अत्याचाराबाबत इतके आक्रमक आहे की, न्यायासाठी ते राजभवनात ठाण मांडून बसले आहे, असे जागरुक महिला महामंडळ मध्ये प्रदेश, उत्तर प्रदेशात नसावे याची खंत कुणास वाटू नये?

महत्वाच्या बातम्या