मुंबई : लोकसभा व राज्यसभेत वावरण्यास व वार्तांकण करण्यास पत्रकारांना केंद्र सरकारने बंदी घातली आहे. यावर आजच्या सामनातील रोखठोकमधून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. लोकसभा व राज्यसभेच्या पत्रकार कक्षातून डोकावणारे पत्रकार ही लोकशाहीची खरी मौज होती. असे संजय राऊत म्हणाले आहेत.
राऊत लिहितात, लोकशाहीचे महत्त्व, पक्षीय निष्ठा याचे मोल कसे संपले आहे ते आता रोजच दिसत आहे. न्यायाचे तर सारे खोबरे झाले आहे. देशात Free and Fair असे काही उरलेच नाही. मंगळवारी राज्यसभेतील गोंधळ पाहून श्री. शरद पवार यांनी विचारले, ”अजूनही संसदेचे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना संसदेत येण्यावर बंदी आहे. हे बरोबर नाही.” लोकसभा व राज्यसभेच्या पत्रकार कक्षातून डोकावणारे पत्रकार ही लोकशाहीची खरी मौज होती. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात येण्यापासून पत्रकारांना थांबविले गेले. ”लोकांचा लोकांशी फार संपर्क होऊ द्यायचा नाही. बोलणाऱ्यांच्या भोवती तटबंदी उभी करायची, असे या सरकारचे एकंदरीत धोरण आहे,” अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली.
अनंत बागाईतकर हे ३० वर्षे दिल्लीत पत्रकारिता करीत आहेत. संसदेच्या माध्यम सल्लागार समितीचे ते सचिव, पण चार दिवसांपूर्वी त्यांनी सचिवपदाचा राजीनामा राज्यसभेचे चेअरमन व्यंकय्या नायडू यांच्याकडे पाठवला. पत्रकारांना संसदेत प्रवेश नाकारला जात असेल तर पदावर राहून काय फायदा? संसदेत प्रेक्षक गॅलऱ्या बंद केल्या हे एक वेळ समजू शकतो, पण पत्रकारांच्या गॅलऱ्याही बंद ठेवल्या. हे सर्व सरकारी मर्जीने सुरू आहे! संसदेच्या आवारातील भव्य पुतळ्यांनाही एकेकाळी जिवंतपणा होता. आता संसदेत वावरणारी सत्तापदावरील माणसेही निर्जीव असल्यासारखी वागतात. गेली अनेक वर्षे मी संसदेच्या आवारात वावरतो आहे.
गेल्या पिढीत व आमच्या पिढीतील फरक कोणता, असे काहीजण मला विचारतात, तेव्हा मी त्यांना असे सांगतो की, तुमच्या पिढीने मनोरे उभारताना पाहिले. आमच्या पिढीने ते कोसळताना पाहिले. आदर्श, परंपरा, संस्कारांचे सर्व मनोरे एकामागून एक कोसळून पडावे तसे घडले आहे, घडत आहे. त्या मनोऱ्यांच्या ढिगाऱ्यातून अडथळे पार करत संसदेत पोहोचावे लागते. हे आजच्या दिल्लीचे चित्र आहे.
महत्वाच्या बातम्या
- “स्वतःला ‘देव’ म्हणवून घेणारे तोऱ्यात वावरत आहेत”, राऊतांचा राेखठोकमधून मोदींवर प्रहार
- “सफाई कामगाराने आत्महत्या केली, आता ३ जणांचे निलंबन करुन काय फायदा?”
- शाळेबाबत अद्याप निर्णय नाही; राजेश टोपेंची माहिती
- …म्हणून मेनका गांधींनी माझी भेट घेतली; आव्हाडांनी केला त्या भेटीचा खुलासा
- केंद्र सरकार पुन्हा कृषी कायदे आणण्याच्या तयारीत?; केंद्रीय कृषीमंत्र्यांचं धक्कादायक वक्तव्य