पुणे : कालच बहुचर्चित ठाकरे सिनेमाचा धडाकेबाज ट्रेलर रिलीज झाला. सोशल नेट्वर्किंग साईट वर ठाकरे सिनेमा बाबत अनके पोस्ट पहायला मिळत आहेत. मात्र या दरम्यान सोशल मीडियावर शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष बाला लोकरे यांची वादग्रस्त पोस्ट येऊन पडल्याने सिनेसृष्टी मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

२५ जानेवारीला ठाकरे सिनेमा व्यतिरिक दुसरा कोणताच सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही अशी पोस्ट बाला लोकरे यांनी केली होती. या पोस्टनंतर उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या.यानंतर त्या पोस्ट बाबत बोलताना खा. राऊत यांनी सारवासारव केली. खा.संजय राऊत यांनी मात्र या पोस्ट संदर्भात बोलताना ‘सदर पोस्ट ही शिवसेना पक्षाकडून अधिकृत नसल्याचे त्यांनी सांगितले.राऊत यांनी दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे या वादावर तूर्तास पडदा पडेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.