आक्रमक झालेली नाणार प्रकल्पा विरोधातील संघर्ष समिती राणेंच्या भेटीला

टीम महाराष्ट्र देशा : रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स या तेलशुद्धीकरण प्रकल्पाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला आहे. या प्रकल्पाला सुरवातीपासूनच शिवसेनेचा कडवा विरोध होता मात्र, या विरोधाला झुगारून केंद्र सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. मात्र आता आक्रमक झालेली प्रकल्पविरोधी संघर्ष समिती महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांच्या भेटीसाठी पोहोचले. पुढची रणनीती ठरवण्यासाठी ही भेट झाल्याच समजत आहे.

bagdure

या प्रकल्पामध्ये सौदी अरेबियाची अरामको ही बडी कंपनी 50 टक्के गुंतवणूक करणार आहे. या संदर्भातल्या सामंजस्य करारावर आज (बुधवार) नवी दिल्लीत सह्या झाल्या आहेत.

इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांचा हा संयुक्त प्रकल्प रत्नागिरीजवळील नाणार येथे उभारण्यात येणार आहे. या संदर्भात प्रारंभिक करारावर स्वाक्षऱ्या झाल्याचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद प्रधान यांनी सांगितले असून सविस्तर बोलणी सुरु असल्याचे ते म्हणाले.

You might also like
Comments
Loading...