‘कोरोना काळात जीव धोक्यात घालुन रेशन दुकानदारांनी रेशन वाटले परंतु कमिशन काही मिळाले नाही’

ration store

तुळजापूर – कोरोना काळात एप्रील ते जुन या कालावधीत रेशन दुकानदारांनी जीव धोक्यात घालुन जनतेला संकटात रेशन वाटले परंतु त्याचे आजपर्यत कमिशन दिले गेले नाही व कोरोना पासुन संरक्षण करणारे किट अद्याप पर्यंत उपलब्ध करुन दिले नसल्याने जीव धोक्यात घालुन आजही रेशनधान्य दुकानदार अन्नधान्य वितरण करीतच असल्याने कमिशन व कोरोना संरक्षण किट त्वरीत देण्याची मागणी रेशनधान्य दुकानदार संघटनेने केली आहे.

कोरोना सारख्या संकटाचा काळात जीव धोक्यात घालुन रेशन दुकानदारांनी मोफत अन्नधान्य वाटले परंतु त्याचे एक पै ही कमिशन दिले नाही.सरकार रेशनधान्य दुकानदारांना कुठल्याही सुविधा आरोग्याचा दृष्टीने पुरवत नाही तसेच रेशनधान्य दुकानदार व त्यांच्या सहाय्यकांची कुठलीही आरोग्य तपासणी होत नसल्याचे दिसुन येत आहे.

केंद्र सरकारचा परिपञका नुसार वाटप केलेल्या मोफत अन्नधान्य वितरण चे कमिशन कोण देणार राज्य कि केंद्र या बाबतीत खुलासा करावा तसेच हमालांचे व कमिशन चे पैसे त्वरीत देण्यात यावेत व रेशनदुकानदार यांना व त्यांच्या मदतनिसांना विमा संरक्षण त्वरीत द्यावे अन्यथा आँल इंडीया महाराष्ट्र रेशनिंग शाँपकिपर फेडरेशन वतीने जाहीर केलेले धान्य वितरण करणार नसल्याचा म्हटले आहे.

याप्रश्नी तातडीने दखल घेण्याची मागणी संघटनेचे अध्यक्ष माजी खा. गजानन बाबर, जिल्हा अध्यक्ष समाधान कदम, अमर कर्जत, शिवाजी जाधव, प्रफुल्लकुमार अण्णा शेटे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच प्रधान सचिव अन्न पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांना दिले आहे.

आणखी एका मालिकेच्या सेटवर सापडला कोरोना रुग्ण

आनंदाची बातमी : कोरोनावरील आणखी एक औषध लवकरच बाजारात, जाणून घ्या किंमत…

माफ करा आम्हाला, पोलीस व डॉक्टरांनो आमचा आत्मा मेला आहे! : मनसे