‘दोन्ही राजेंचा अभिमानच, पण या नालायक ठाकरे सरकारकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा…’

nilesh rane vs uddhav thakceray

पुणे : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. खासदार संभाजी छत्रपती यांनी ६ जून रोजी रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या १६ जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या संदर्भात खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजी छत्रपती यांची बहुप्रतिक्षीत भेट काही दिवसांपूर्वी उदयनराजे यांच्या आधीच ठरलेल्या काही कार्यक्रमांमुळे होऊ शकली नव्हती. त्यामुळे राज्यभरात उलट-सुलट चर्चांना उधाण आले होते. अखेर, आज ( १४ जून ) पुण्यात हे दोन्ही राजे भेटले आहेत. या भेटीकडे सबंध महाराष्ट्राचं लक्ष्य लागलं होतं. या भेटीनंतर दोन्ही राजे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि इतर समस्या सोडवण्यासाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

आता या भेटीवर विविध नेते प्रतिक्रिया देत आहेत. भाजप नेते निलेश राणे यांनी ‘महाराष्ट्र देशा’ला या भेटीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी सुरुवातीपासूनच सांगतोय ठाकरे सरकारला आरक्षणाबाबत चलढकलच करायची आहे. प्रत्येक वेळेला केंद्राकडे बोट दाखवायला आणि वेळ मारून यायची ही या सरकारची पारंपरिक भूमिका आहे. दोन्ही राजेंचा आम्हाला अभिमान आणि आदर आहेच. पण हे सरकार नालायकच आहे. यांच्याकडून अपेक्षा ठेवणं म्हणजे आपला वेळ वाया घालवण्यासारखं आहे. म्हणून सर्वानी एकत्र येऊन महाराष्ट्रासमोर एक भूमिका ठेवली पाहिजे,’ असं राणे म्हणाले.

पुढे त्यांनी ठाकरे सरकारवर जहरी टीका देखील केली आहे. ‘भिकाऱ्यांकडे द्यायला काय नसतं, त्यामुळे त्यांच्याकडे मागून काही उपयोग नाही.  राजेंच्या गादीचा मान सर्वांनाच आहे. त्यांनी एकत्र येऊन यावर ठाम भूमिका घ्यावी. ते राजे आहेत ते सगळ्यांना एकत्र येऊ शकतात. त्यामुळे त्यांनी सरकारकडे जाणं बंद करावं, जे काय होईल ते मैदानातच,’ अशी भूमिका निलेश राणे यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना स्पष्ट केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP