रतन टाटा यांनी बुधवारी संघ मुख्यालयाला भेट दिली

टाटा सन्स उद्योगसमूहाचे चेअरमन रतन टाटा आज नागपूरच्या रेशीमबागमधल्या संघ मुख्यालयात गेले होते. सरसंघचालक मोहन भागवत आणि रतन टाटा यांची चर्चा झाली. सायरस मिस्री यांच्या हकालपट्टीनंतर ही भेट झाल्यामुळे चर्चेला उधाण आलंय.

याआधी रतन टाटा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेतली होती. टाटा ग्रुपच्या चेअरमनपदावरून सायरस मिस्त्री यांची हकालपट्टी झाल्यानंतर रतन टाटा पंतप्रधानांना भेटले होते.

बुधवारी दुपारी रतन टाटा आणि भाजप नेत्या शायना एनसी नागपूरमध्ये दाखल झाले. सर्वप्रथम त्यांनी रेशमबागमधील हेडगेवार स्मृती मंदिराला भेट दिली. यानंतर ते दोघेही संघ मुख्यालयात दाखल झाले.  संघ मुख्यालयात रतन टाटा यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत चर्चा केली

You might also like
Comments
Loading...