पिंपळगाव जोग्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको

टीम महाराष्ट्र देशा- पारनेरच्या हक्काचं असणारं पिंपळगाव जोगा धरणातील पाणी सोडून वीस दिवस लोटूनही ते पारनेर मध्ये दाखल न झाल्याने पारनेर तालुक्यातील सबंधित वडझिरे , देविभोयरे, अळकूटी, लोणीमावळा आदी गावातील कार्यकर्त्यांनी संतप्त होवून थेट देविभोयरे फाटा येथे दोन अडीच तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी विश्वनाथ कोरडे , वडझिरे गावचे  सरपंच शिवाजी औटी, संतोष काटे आदि आंदोलनकर्त्यांनी आपल्या संतप्त भूमिका मांडल्या व लेखी निवेदन कार्यकारी अभियंता कानडे यांच्याकडे दिले. संध्याकाळी जर पारनेरमध्ये पाणी आले नाही तर दुसऱ्या दिवशी याही पेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

दरम्यान, कार्यकारी अभियंता कानडे यांनी पारनेर मध्ये संध्याकाळी च पाणी पोहचले जाईल असे आश्वासन देवून आंदोलनकर्त्यांना शांत केले.