पुण्यात रास्ता रोको करण्याच्या प्रयत्नात असणारे मराठा आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

पुणे : आरक्षणाच्या मागणीवर राज्यभरात मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत, आज पुण्यातील वारजे येथे मराठा मोर्चाच्या वतीने आज अकरा वाजण्याच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रास्ता रोको करणा-या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

आरक्षणाच्या मुद्यावर शरद पवारांनी ३६० डिग्री टर्न का घेतला ? – भंडारी

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यभरात मराठा क्रांती ठोक मोर्चे काढले जात आहेत, काल मुंबई आणि परिसरात बंद पाळण्यात आला होता. यावेळी आंदोलक आक्रमक झाल्याचं पहायला मिळाल. दरम्यान, शांततेच्या मार्गाने सुरू असणारे आंदोलन हिंसक होत असल्याने दुपारच्या सुमारास बंद स्थगित करण्यात आला. मात्र, अद्यापही राज्यात अनेक ठिकाणी ठिय्या आंदोलन तसेच रास्ता रोको केलं जातं आहेत.

पुण्यातील वारजे माळवाडी परिसरातील वारजे उड्डाणपुलाखाली आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मराठा क्रांती मोर्चाचे अनेक कार्यकर्ते एकत्र आले होते, यावेळी आंदोलकांनी पुणे – मुंबई हायवे रोखण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड करत हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला.

मराठा समाजाचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास राहिलेला नाही- बच्चू कडू

काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित प्रमुख मागण्या

  • मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
  • मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
  • राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
  • आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.
  • मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
  • अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.
  • आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.