नेताच पाठीशी नसेल तर झिजण्याला काय अर्थ, रश्मी बागलांनी सोडली राष्ट्रवादीची साथ

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार गळती लागल्याचं दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम केल्यानंतर आता करमाळ्याच्या बागल परिवाराने राष्ट्रवादीची साथ सोडली आहे. करमाळ्याच्या राजकारणातील बडे प्रस्थ असणाऱ्या रश्मी बागल उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय मामा शिंदे यांचा प्रमाणिकपणे प्रचारकरूनही पक्ष न्याय करत नसल्याची भावना बागल कुटुंबामध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे रश्मी बागल, त्यांचे भाऊ दिग्विजय बागल यांच्यासह राष्ट्रवादीचे हजारो कार्यकर्ते उद्या मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

Loading...

शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेण्यापूर्वी रश्मी बागल यांनी तालुक्यातील समर्थकांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी सर्वांचे मतं घेत शिवसेनेत जाण्याचा निर्णय बागल यांनी घोषीत केला आहे.

दरम्यान, दिग्विजय बागल यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करत फेसबुक पोस्ट केली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रामाणिकपणे काम करूनही पक्षाकडून डावलले जात असल्याची खंत व्यक्त केली आहे.

दिग्विजय बागल यांची फेसबुक पोस्ट

हा गट माझा किंवा रश्मी दिदींचा नाही. तर मामांनी तळागाळातील सामान्य माणसांना सोबत घेऊन उभा केलेला हा बागल गट आहे. याची वाढ करायची असेल, योग्य दिशा देऊन पुढे घेऊन जायचे असेल तर त्यासाठी हा निर्णय घेणं गरजेचे होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आम्ही निष्ठेने आणि प्रामाणीकपणे काम केले. पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी दिलेला शब्द कधी खाली पडू दिला नाही. लोकसभेच्या निवडणूकीत सर्व मतभेद विसरून एकदिलाने पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मैदानात उतरलो. केवळ उतरलोच नाही तर उमेदवारापेक्षाही अधिक सभा, बैठका, प्रचार फेऱ्या, जनतेशी संवाद साधून उमेदवाराला तालुक्यातून लिड मिळवून दिले. पक्षानी दिलेल्या शब्दाला जागलो. ही तळमळ, धडपड तालुक्यातील संपुर्ण जनतेने जवळून अनुभवली आहे. पण दुर्दैवाने आपल्या उमेदवाराला अपयश आले. लोकसभेला संजय मामा तर विधानसभेला रश्मी बागलच असणार असा शब्द पक्षानी दिला होता. आम्ही पक्षाला जागलो पण आता पक्ष दिलेला शब्द पाळायला तयार नाही. आम्ही पाठपुरावा केला, चर्चा केली पण पक्षाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, अजूनही मिळत नाही.

संजय मामांनी निवडणूक लढविण्याचे जाहीर केले नसले तरी, नाही लढणार असेही जाहीर केले नाही. त्यामुळे सतत संभ्रमाचे वातावरण. तर दुसरीकडे संजय मामांच्या कार्यकर्त्यांकडून निवडणूकीसाठी बैठका सुरु झाल्या. काहीही न बोलता हे सगळ संजय मामाच करत आहेत हे तालुक्यातील प्रत्येक माणसालाही दिसतं होते. परंतु, पक्षाला दिसले नाही. पक्षानी म्हणून कधीही याचा खुलासा केला नाही किंवा काहीही झालं तरी विधानसभेला आपल्याशी एकनिष्ठ राहिलेल्या रश्मी बागल यांनाच तिकीट देणार असेही जाहीर केले नाही. अशी आमची चुक तरी काय झाली होती. ती अजूनही समजायला तयार नाही.

त्यामुळे नाईलाजानेच हा निर्णय घ्यावा लागला. पक्षाने आमच्याकडे दुर्लक्ष केले म्हणून बागल गटावर अतोनात प्रेम करणाऱ्या, निष्ठावान आणि कोणत्याही परिस्थितीत कायम साथ देणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही फसवू शकत नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. जनता आमच्यावर जो विश्वास टाकत आहे त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही यासाठीच हा निर्णय घेत आहोत.

करमाळा-माढा मतदारसंघातील सर्व जनतेला आमचे आवाहन आहे, की आपण कायमच बागल कुटुंबाला साथ दिली, विश्वास दाखवला, शब्बासकीची थाप टाकली. त्याची पुन्हा एकदा गरज आहे. आणि आम्हाला खात्रीच नाहीतर आत्मविश्वास आहे की आमची ही मायबाप जनता, वडीलधारी मंडळी, आमच्या लहान-मोठ्या भावा सारखे सर्व कार्यकर्ते, माता-बघीनी आमच्या पाठीशी उभ्या राहतील, आणि शेवटपर्यंत साथ देतील.

हा गट माझा किंवा रश्मी दिदींचा नाही. तर मामांनी तळागाळातील सामान्य माणसांना सोबत घेऊन उभा केलेला हा बागल गट आहे. याची वाढ करायची असेल, योग्य दिशा देऊन पुढे घेऊन जायचे असेल तर त्यासाठी हा निर्णय घेणं गरजेचे होते.

राज्यात शिवसेना-भाजपचे वातावरण आहे. यावेळी सुद्धा शिवसेना-भाजपची सत्ता येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नुसत आमदार होऊन चालणार नाही. जनतेच्या कामासाठी पक्षाचीही मदत अत्यावश्यक आहे. ज्या पक्षाला निष्ठेची कदर नाही आणि जिथे आपलेच नेते आपले नुकसान करायला बसलेत, कारखाने अशेच आणखी अडचणीत रहावेत असे वाटणारे लोक जिथे आहेत तिथे का थांबायचे. अशावेळी जो पक्ष लहानातील लहान आणि मोठ्यातील मोठ्यांना समान समजतो, तळागाळातील जनतेसाठी काम करतो त्याच्यासोबत जायला हरकत नाही. अनेकांना हा निर्णय चुकीचा वाटू शकतो पण अनेक वर्ष बागल गटाला गृहीत धरून चालण्याची सवय राष्ट्रवादीला लागली होती. याचा अनुभव जनतेनीसुद्धा घेतला आहे. १३ वर्षांपासून आम्ही अजून झगडतोच आहे. हा संघर्ष संपायलाच तयार नाही. जिथे नेताच ठामपणे पाठीशी उभा नसेल तिथे उगाचच झिजण्याला काय अर्थ आहे. त्यामुळेच हा एवढा मोठा निर्णय तुम्हा सर्वांच्या जिवावरच घेतला आहे.

– दिग्विजय बागल

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
जाणून घ्या, नाथाभाऊंच्या एकुलत्या एक मुलाने आयुष्य संपविले त्या दिवशी नेमकं काय घडलं ?