पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि नगरसेवकाचा एकमेकांवर ‘हल्लाबोल’

चिंचवड: सध्या राज्यभरात भाजप सरकार विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ‘हल्लाबोल’ आंदोलन केले जात आहे. आज पिंपरी- चिंचवडमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात पिंपरी-चिंचवडमध्ये हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. मात्र हे आंदोलन संपताच राष्ट्रवादीचे माजी आमदार आण्णा बनसोडे आणि माजी नगरसेवक काळुराम पवार यांनी एकमेकावर ‘हल्लबोल’ चढवत हाणामारी केली. चिंचवडच्या चापेकर चौकात झालेल्या या तुंबळ हाणामारीत गाड्या देखील फोडण्यात आल्या आहेत.