‘राष्ट्रवादी जीवलग’ योजनेचा झाला शुभारंभ; अजितदादांना मिळाले वाढदिवसाचे अनोखे गिफ्ट…

ajit pawar

मुंबई  – राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून ‘राष्ट्रवादी जीवलग’ या योजनेचा शुभारंभ खासदार सुप्रिया सुळे यांनी ४५० अनाथ मुलांशी संवाद साधत केला. अजित पवार यांच्यासाठी वाढदिवसाचे हे अनोखे गिफ्ट होते.

काल दिल्लीतून खासदार सुळे यांनी ‘राष्ट्रवादी जीवलग’ या योजनेची घोषणा करताना अजितदादा पवार यांच्या आजच्या वाढदिवशी शुभारंभ करण्याचे जाहीर केले होते. आज सकाळी झूमद्वारे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी राज्यातील ४५० अनाथ मुलांशी व त्यांच्या नातेवाईकांशी राष्ट्रवादी दूतांसह संवाद साधला.

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून काही वर्षे हे नातं घनिष्ट होणार असून ४५० कुटुंबाचा एक गोतावळा निर्माण झाला पाहिजे हा या कार्यक्रमाचा भाग असल्याचे सुळे यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रवादी दूतांसोबत अनाथ मुलांशी संवाद साधताना त्यांच्या सोबत असलेल्या कुटुंबातील सदस्यांशी ओळख करून घेतली. शिवाय त्या मुलांना पुढे जाऊन काय करायचं आहे. व त्यांच्या समस्या आणि अडचणी समजून घेतल्या.

या मुलांच्या सतत त्यांच्या सुखदुःखात सोबत राहण्याच्या सूचना राष्ट्रवादी दूतांना खासदार सुळे यांनी यावेळी दिल्या. अजित पवार यांचा आज ६२ वा वाढदिवस असून ‘राष्ट्रवादी जीवलग’ हा एक अनोखा उपक्रम राबवत खासदार सुळे यांनी अजितदादांना वाढदिवसाची अनोखी भेट दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP