रश्मी बागलांच्या शिवबंधनाचा कुणाला फायदा, कुणाला तोटा ?

गौरव मोरे- विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी गळती लागली असून राष्ट्रवादीच्या प्रांतिक सदस्या आणि राष्ट्रवादीच्या माजी आमदार श्यामल बागल यांच्या कन्या रश्मी बागल यांनी आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी राष्ट्रवादीला रामराम करून शिवसेनेचे शिवबंधन बांधण्याचे निश्चित केले असल्यामुळे फायदा कुणाचा आणि तोटा कुणाला हा प्रश्न करमाळा तालुक्यातील जनतेला पडलेला आहे.

राष्ट्रवादीत प्रामाणिकपणे काम करूनही पक्षातून होणाऱ्या विरोधाला कंटाळलो आहोत पक्ष निष्ठा फक्त बागल गटानेच पाळायची का? असा सवाल करत मकाई चे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी करत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले.

Loading...

रश्मी बागल यांच्या शिवसेना प्रवेशामुळे राष्ट्रवादीला आगामी करमाळा विधानसभा निवडणुकीत चांगलाच फटका बसू शकतो तर बागल शिवसेनेत येणार असल्यामुळे शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांच्या पाटील गटात खळबळ उडालेली आहे. विधानसभेला आमदार पाटील यांना करमाळ्यातून उमेदवारी मिळणार की रश्मी बागल यांना उमेदवारी मिळणार याकडे सगळ्या तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.

सध्याचे शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांची उमेदवारी डावलली आणि रश्मी बागल यांना उमेदवारी मिळाली तर याचा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे.नारायण पाटील हे जिल्ह्यातील सेनेचे एकमेव आमदार आहे तसेच मागील पाच वर्षांचा विकासाचा लेखाजोखा काढला तर पाटलांचे पारडे सध्यातरी जड आहे त्यांना डावलले तर त्यांच्याकडून बंडखोरी होऊ शकते याचा थेट फायदा पाटलांना होईल.

तर दुसरीकडे रश्मी बागलांनी शिवसेना प्रवेश करूनही विधानसभेला उमेदवारी मिळाली नाही तर त्यांना अडचणी येऊ शकतात.एकतर राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश आणि उमेदवारी नाही मिळाल्यास त्यांना आमदार नारायण पाटील यांना पाठिंबा द्यायची वेळ येऊ शकते याचा तोटा बागलांना होऊ शकतो.

लोकसभेला शिवसेना-भाजप एकत्र येऊन लढले होते. राज्याच्या विधानसभेला ही युती होईल असा अंदाज आहे परंतु ऐनवेळी युती तुटली तर भाजपकडून आमदार नारायण पाटील लढतील अशी चर्चा सध्या तालुकाभर सुरू आहे. कारण अकलूजचे मोहिते-पाटील सध्या भाजप मध्ये असून मोहिते-पाटील आणि आमदार पाटील यांचा राजकीय संबंध चांगले आहे मागील २०१४ विधानसभेला मोहिते-पाटलांनी आमदार पाटील यांना चांगली मदत केलेली होती. जर युती तुटली आणि पाटील भाजपकडून लढले तर रश्मी बागलांचा शिवसेनेचा मार्ग मोकळा होईल.

एकदंरीत पहायला गेले तर सध्यातरी करमाळ्याचे राजकारण युतीच्या नीतीवर अवलंबून आहे. याचा फायदा कुणाला आणि तोटा कुणाचा होईल हे येत्या काही दिवसांत समजेल.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
मनसेच्या झेंड्यावरून वाद,मराठा क्रांती मोर्चा करणार खटला दाखल
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
तानाजी चित्रपटातील 'तो' आक्षेपार्ह भाग वगळावा; नाभिक समाजाची मागणी
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले