२०१४ चा पराभव धुवून काढण्यात रश्मी बागलांना यश मिळणार का?

करमाळा- विधानसभा २०१४ ला झालेल्या निसटता पराभव धुवून काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल यांना २०१९ विधानसभा सोपी जाणार नाही. करमाळा तालुक्यात विधानसभेची जोरदार तयारी सुरू आसून आगामी विधानसभा कुठल्याही परिस्थितीत जिंकण्यासाठी तालुक्यातील शिवसेनेचे आमदार नारायण पाटील, राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केलेली आहे.

शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांच्या जोरावर आगामी निवडणूक जिंकणार असल्याचे बोलले जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीत पराभव स्वीकारावा लागलेल्या जि प अध्यक्ष संजय शिंदे आगामी विधानसभा लढणार असल्याची चर्चा सध्या जोर धरून आहे. तर मागील पाच वर्षात आदिनाथ कारखाना आणि बाजार समिती जिंकून मिळालेल्या आत्मविश्वासाने कार्यकत्यांना नवसंजीवनी देऊन राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल निवडणूकीला सामोरे जाणार असल्याची चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे.

Loading...

२०१४ विधानसभेला शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांनी रश्मी बागल यांचा २५७ मतांनी पराभव केलेला होता हा पराभव बागलांच्या चांगलाच जिव्हारी लागलेला होता आता आगामी विधानसभेला २०१४ चा पराभव धुवून काढायला यश मिळणार का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?