‘दोन कारखान्यांचा भ्रष्टाचार झाकण्यासाठीचं रश्मी बागलांनी केला शिवसेनेत प्रवेश’

टीम महाराष्ट्र देशा : रश्मी बागल यांनी साखर कारखान्यांमध्ये भ्रष्टाचार केला आहे. चौकशीचा ससेमिरा लागू नये यासाठी वेळीच पळ काढला आहे, असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते दाशरत कांबळे यांनी रश्मी बागल यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत प्रतिक्रीया दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करत आहेत. आज सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या राष्ट्रावादी कॉंग्रेस नेत्या रश्मी बागल यांनी शिवसेना प्रवेश केला. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित हाती शिवबंधन बांधले आहे.

मात्र रश्मी बागल यांच्या शिवसेना प्रवेशामुळे करमाळ्यात राष्ट्रवादीला मोठा फटका बसला आहे. तर रश्मी बागल यांनी आपली भ्रष्टाचाराबाबत कोणतीही चौकशी होऊ नये यासाठी सत्ताधारी पक्षामध्ये पळ काढला असल्याची टीका दशरथ कांबळे यांनी केली आहे. ते म्हणाले की, आदिनाथ आणि मकाई या दोन साखर कारखान्यांमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. अनेक महिला कामगारांना मोलमजुरी करावी लागत आहे. त्यामुळेचं कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊ नये यासाठी रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र काही केलं तरी कायदा हा श्रेष्ठ आहे. कधीना कधी भ्रष्टाचार उघडकीस येईल.

Loading...

दरम्यान,रश्मी बागल यांच्यासोबत इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित या आज शिवसेना प्रवेश केला आहे. गावित यांनी मंगळवारी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिला दिला होता त्यानंतर त्यांनी आज शिवबंधन हाती बांधले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पक्ष बदलाचे वारे जोरात वाढत आहे. कॉंग्रेस – राष्ट्रवादीचे अनेक नेते सत्ताधारी भाजप व शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी उत्सुक असल्याचं दिसत आहे. त्यात आता राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार सुनील तटकरे यांचेही नाव चर्चेत आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या ताब्यात
भाजपचा 'हा' नेता भेटला अजित पवारांना;राजकीय तर्कवितर्कांना उधान
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ