‘रासपने निवडणूक लढवावी आणि भाजपला आपली ताकद दाखवावी’

mahadev-jankar-

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रीय समाज पक्ष हा राज्य सरकारमध्ये भाजपचा मित्रपक्ष आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून रासपच्या कार्यकर्त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळत आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. रासपने निवडणूक लढवावी आणि भाजपला आपली ताकद दाखवावी अशी मागणी रासप कार्यकर्ते करत आहेत. पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना सतत डावलण्यात येत आहे. २०१४ च्या निवडणुकीत ग्रामीण भागात भाजपला विजय मिळवण्यात रासपने मदत केली आणि तोच भाजप आज महादेव जानकरांना टाळत असल्याचं रासपचे प्रवक्ते प्रा.लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.

धनगर समाजातील वेगवेगळ्या पक्षातील सर्व नेते ऐक्याची भाषा बोलत आहेत. त्यामुळे रासप लोकसभेला सर्व जागा लढवू शकते. या आणि अशाच अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी येत्या २३ तारखेला पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाने मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात पक्षाची पुढील भूमिका काय असेल याची दिशा ठरेल. या मेळाव्यात मोठं घमासान होण्याची शक्यता आहेLoading…
Loading...