fbpx

बलात्कार प्रकरणातील आरोपींना भरचौकात गोळी घातली पाहिजे- खा. राम प्रसाद शर्मा

बलात्कार

टीम महाराष्ट्र देशा- बलात्कार प्रकरणातील आरोपींना भरचौकात गोळी घातली पाहिजे असं वक्तव्य भाजपा खासदार राम प्रसाद शर्मा यांनी केलं आहे. दिवसेंदिवस बलात्काराच्या वाढत्या घटनांवर बोलताना संताप व्यक्त करताना त्यांनी हे विधान केलं आहे. राम प्रसाद शर्मा आसाममधील तेजपूरचे खासदार आहेत. काही दिवसांपुर्वी एका चिमुरडीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याच्या घटनेवर बोलताना संतापाच्या भरात बलात्काराच्या आरोपींचा खात्मा करण्यासाठी शुटिंग स्क्वॉड असलं पाहिजे अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.

नेमकं काय म्हणाले शर्मा
‘अशा लोकांच्या मनात बलात्कारासंबंधी भय तेव्हाच निर्माण होईल, जेव्हा त्यांना सर्वांसमोर फासावर लटकवलं जाईल आणि नंतर गोळी घातली जाईल’. ‘बलात्कार करणारा अल्पवयीन असो अथवा प्रौढ, त्याला फाशी अथवा गोळी घालण्याची शिक्षा झालीच पाहिजे.जर कोणी अल्पवयीन बलात्कारासारखा भयंकर गुन्हा करत असेल, तर मग फक्त अल्पवयीन आहे म्हणून त्याला सूट का देण्यात यावी, त्यालादेखील जास्तीत जास्त शिक्षा मिळाली पाहिजे .जोपर्यंत बलात्का-यांना कठोरातील कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत लोकांच्या मनात भीती निर्माण होणार नाही. जोपर्यंत भय निर्माण होत नाही तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत.बलात्काराच्या आरोपींचा खात्मा करण्यासाठी शुटिंग स्क्वॉड असलं पाहिजे. ज्यांचं काम बलात्का-यांना गोळ्या घालण्याचं असेल’.

2 Comments

Click here to post a comment