उत्तर प्रदेशातील ‘रेपिस्ट जिल्हा’ उन्नाव

Gang-rape

टीम महाराष्ट्र देशा : उत्तर प्रदेशातील उन्नाव या जिल्हात घडलेल्या बलात्काराच्या घटने नंतर हा जिल्हा ‘रेपिस्ट जिल्हा’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. या ठिकाणी वर्षभरात तब्बल ८६ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी बलात्कार झालेल्या पिडीतेला या रेप केस मधील आरोपींनी गुरुवारी जाळले. त्यात ती ९० भाजली होती.आणि दिल्लीतील सफदरगंज या रुग्णालयात उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला.

उन्नाव जिल्हाची लोकसंख्या ३१ लाख इतकी आहे. जानेवारी २०१९ ते नोव्हेंबर २०१९ या काळात उन्नावमध्ये ८६ बलात्काराची आणि १८५ महिलांसोबत लैंगिक अत्याचार झाल्याची प्रकरणे देखील समोर आली आहेत. उन्नाव जिल्हातील असोह, अजगैन, बांगरमऊ आणि माखीमधून अधिक बलात्काराचे गुन्हे दाखल करण्यात आली आहेत.या मधील बहुतांश आरोपींना जामीन मिळाला आहे आणि ते बाहेर मोकाट फिरत आहेत. त्यामुळे जिल्हातील इतर महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आलाय. या प्रकरणामध्ये स्थानीक जनता पोलिसांना दोष देत आहेत.

“उन्नाव जिल्हातील पोलीस नेत्यांच्या इशाऱ्यावर चालतात जो पर्यंत नेत्यांकडून पोलिसांना आदेश मिळत नाही तो पर्यंत पोलीस कोणतीच कारवाई करत नाही, त्यामुळे अपराधी असे करतात.” असे व्यक्तव्य स्थानिक नागरिक राम शुक्ला यांनी केले.

तर तेथील स्थानिक वकिलाने सांगितले की,”राजकारणामुळे आरोपींना अजून चालना मिळत आहे. राजकारणी आपल्या राजकीय हेतू साध्या करण्यासाठी अशा आरोपींचा उपयोग करतात आणि या ठिकाणी पोलीस फक्त नाममात्र असतात. जो पर्यंत अशा घटनांना योग्य न्याय मिळणार नाही तो पर्यंत अशा घटना होताच राहतीलआणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येईल,”असे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या