बलात्कारी बाबा राम रहीम करणार जेलमध्ये ‘हे’ काम

पल्याच साध्वीवरील बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम सध्या रोहतकच्या जेलमध्ये कैद आहे. बलाक्तारी बाबाला २० वर्षाची शिक्षा ठोठवण्यात आली आहे. राजा सारखे आयुष्य जगणाऱ्या राम रहीमला आता तुरुंगात माळी काम देण्यात येणार आहे. या कामासाठी त्याला दिवसाला ४० रुपये मजुरी मिळणार आहे.

आपल्या अलिशान गुहेत राहणारा बाबा आता ८ बाय ८ च्या जेल कोठरीत शिक्षा भोगत आहे. काही वृत्त वाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार बलात्कारी बाबा कोठडीच्या भिंतींशी बोलतो. तर दिवसातील बराच वेळ तो मेडिटेशन करण्यातच घालवतो. राम रहीमच्या किंगसाईज बेड आणि वेल्वेटच्या पांघरुणाची जागा आता कापसाची गादी आणि खडबडीत पांघरुणाने घेतली आहे.