संतापजनक : मदरस्यात १२ वर्षीय बालिकेवर बलात्कार

टीम महाराष्ट्र देशा : मेरठमधील सरुरपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एका गावातील मदरस्यात शिकवणारे शिक्षक शाहीद ह्याला पोलिसांनी अटक केली आहे. कुराण कंठस्थ असणाऱ्या या शिक्षकावर १२ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

शाहिद मुलांना गावातील मदरस्यामध्ये शिकवतो. शाहिदने गावातील एका मुलीवर बलात्कार केला असा आरोप आहे. शाहीदने पिडीतेला धमकी दिली की तिने याबद्दल कुणाला काही सांगितले तर तो तिला मारुन टाकेल.

कुठूनतरी या प्रकरणाची कुणकुण मुलीच्या कुटुंबास लागली. त्यांनी मदरस्यात शाहिदला शोधण्याचा प्रयत्न केला, पण तो सापडला नाही. तो पळून गेला. मुलीच्या काकाने सरुरपूर पोलीस ठाण्यात शाहिदविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे . वैद्यकीय तपासणीसाठी मुलीला दवाखान्यात पाठविण्यात आले. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार आरोपी शाहिद याने आत्तापर्यंत ३ वेळा बलात्कार केला आहे. परंतु, याबाबत मुलीने घरी काहीही सांगितलेले नाही.

पोलिसांनी या लिंगपिसाट शिक्षकाचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. शिक्षण देणाऱ्या शिक्षकाने असे घृणास्पद काम करावे, हेच खरेतर पचत नाही. अशा प्रवृत्ती समाजातून नष्ट होण गरजेच आहे. शाळेत, मदरसे येथे शिकायला जाणाऱ्या मुली खरंच सुरक्षित आहेत काय ? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.