बलात्कार म्हणजे समाजात नैसर्गिकपणे झालेले प्रदूषण : भाजप आमदार

टीम महाराष्ट्र देशा : भाजपनेत्यांच्या बेताल वक्तव्यांची मालिका सुरूच असून उत्तर प्रदेशचे भाजप आमदार सुरेंद्र सिंग यांच्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. भगवान रामालाही बलात्कार रोखता येणार नाहीत,असे खळबळजनक वक्तव्य सिंग यांनी काल केले आहे तसेच बलात्कार हे समाजात नैसर्गिकपणे झालेले हे प्रदूषण आहे असेही  सिंग यांनी म्हटले आहे.

भगवान राम जरी आले तरी बलात्काराच्या घटना रोखता येणार नाहीत, असा मी छातीठोकपणे दावा करत बलात्कार हे समाजात नैसर्गिकपणे झालेले हे प्रदूषण आहे असे सिंग यांनी म्हटले आहे. उन्नावमधील विनयभंगाची घटना समाज्यासमोर प्रसारित झाली. यावर सिंग यांची प्रतिक्रिया विचारल्यावर त्यांनी वरील वक्तव्य केलं. इतर माणसेसुद्धा आपल्या कुटुंबातील आहेत, हे लोकांनी मानले पाहिजे. नीती चांगली असेल तर आपण हे नियंत्रित करू शकतो असंही यावेळी ते बोलले.

मी जर बोललो तर वादंग निर्माण होऊ शकतो – रामदेव बाबा

संतापजनक : भगतसिंग यांना ‘शहीद’ दर्जा देण्यास पंजाबचा सरकारचा नकार