बलात्कार अशी गोष्ट आहे जी थांबू शकत नाही, भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान

टीम महाराष्ट्र देशा : देशात बलात्काराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे देशातील महिला आणि तरुणी असुरक्षित असतानाच एका भाजप नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बलात्कार अशी गोष्ट आहे जी थांबू शकत नाही. परंतु, बलात्काराच्या घटनांमध्ये ८७ टक्के वाढ चिंताजनक आहे, असे भाजपच्या मंत्र्यांनी म्हंटले आहे.

राजस्थानचे माजी मंत्री कालीचरण सराफ यांनी बलात्कारा बाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले की, यपूरमधील चिमुकलीशी लैंगिक अत्याचाराची घटना अत्यंत संतापजनक आहे. राज्यात कायदा-व्यवस्था राखण्यात काँग्रेस सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. भाजपच्या काळात देखील अशा प्रकारच्या घटना घडत होत्या मात्र अशा घटनांवर नियंत्रण मिळवण्यात भाजप सरकारला यश मिळाले होते.

दरम्यान देशात सध्या बलात्काराचे प्रमाण वाढले आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. दररोज बलात्कार होत असल्याची घटना उघडकीस येत आहे. त्यामुळे प्रशासन महिला सुरक्षिततेच्या बाबतीत किती सजग आणि जागृक आहेत, हा चर्चेचा मुद्दा ठरला आहे.Loading…
Loading...