बलात्कार मुक्त भारत चळवळ : मुलभूत हक्क आणि महिला सबलीकरण संघटना घालणार महालक्ष्मीला साकडे

rape minor

पुणे : महिलांवर होणा-या अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ  होत असून आज भारतात १० लाख बलात्कार आणि अत्याचाराचे खटले प्रलंबित आहेत . न्यायालयीन प्रक्रियेमध्ये पुरावे , साक्ष अशा अनेक कारणांनी वर्षानुवर्षे पिडीत न्याय मिळण्याची केवळ प्रतीक्षाच करते . अनेक पिडीतांना तर मृत्यू येई पर्यंतही न्याय मिळाला नाही . हिम्मत करून ती न्यायदेवातेकडे धाव घेते खरी पण न्यायालयीन प्रक्रीयेत होणाऱ्या विलंबामुळे प्रत्येक दिवस तिच्यावर झालेल्या अत्याचाराच्या जखमा ताज्या करत राहतो . अशाच पीडितांच्या बाजूने मुलभूत हक्क आणि महिला सबलीकरण संघटनेने बलात्कार मुक्त भारत चळवळ सुरु केली आहे. या चळवळी विषयी मुलभूत हक्क आणि महिला सबलीकरण संघटनेच्या अध्यक्ष अॅड. दीप्तीताई काळे यांनी पत्रकार परिषदेत  माहिती दिली.

पुराव्यांचा भाग कुठे चुकते , न्यायालायीन प्रक्रीयेत त्रुटी आढळतात , भावनिक खच्चीकरण , आर्थिक समस्या अशा अनेक कारणांमुळे पिडीत मुलींच्या आयुष्याचा खेळ होतो . आजही समाज त्यांना पुन्हा समजाचा घटक म्हणून स्वीकरत नाही. अशा महिलांच्या बाजूने सर्वतोपरी लढा देण्यासाठी मुलभूत हक्क आणि महिला सबलीकरण संघटना कार्य करणार आहे असे मुलभूत हक्क आणि महिला सबलीकरण संघटनेच्या अध्यक्ष अॅड. दीप्तीताई काळे यांनी सांगितले .

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने , मुलभूत हक्क आणि महिला सबलीकरण संघटनेच्या वतीने महालक्ष्मीला बलात्कार मुक्त भारत निर्मितीचे साकडे घालण्यात येणार आहे . १३ ऑक्टोबर २०१८ रोजी दुपारी ३ वाजता श्री . महालक्ष्मी मंदिर , सारसबागे समोर , पुणे येथे मुलभूत हक्क आणि महिला सबलीकरण संघटनेच्या वतीने आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे . श्री . महालक्ष्मीला साकडे घालून मुलभूत हक्क आणि महिला सबलीकरण संघटनेच्या बलात्कार मुक्त भारत चळवळीचा कार्यप्रारंभ करण्यात येणार आहे .

या पत्रकार परीक्षदेमध्ये मुलभूत हक्क आणि महिला सबलीकरण संघटनेच्या अध्यक्ष अॅड. दीप्तीताई काळे , रजनी काळे,संध्या सोनावणे,ईशा कोळेकर,अॅड.वृंदा करंडे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.