शिक्षण संस्था चालकाच्या मुलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

अकोला – जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील एका शिक्षण संस्थाचालकाच्या मुलाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणातील आरोपीला अद्यापही अटक करण्यात न आल्याने आज,मंगळवारी पीडित युवतीने पत्रकार परिषद घेऊन आरोपीला अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

मूर्तिजापूर येथील प्रसिद्ध शिक्षण संस्था चालक डॉ. राजेश कांबे यांचा मुलगा संकेत राजेश कांबे याने एका युवतीवर लग्नाचे आमिष दाखवून तिचा लैंगिक शोषण केल्याची तक्रार २ जानेवारी रोजी मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन ला करण्यात आली होती. सदर पीडित युवती हि कांबे यांच्या पॉलिटेक्निक कॉलेज ला शिकत होती.

दरम्यान आरोपी संकेत आणि पीडितेची ओळख झाली. आरोपीने आपल्यावर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार आपले लैंगिक शोषण केल्याचे पीडित युवतीचे पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हणणे आहे. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर हि आरोपीला अटक करण्यात आली नाही. त्यामुळे मूर्तिजापूर पोलीस आरोपीला पाठीशी घालत असल्याने आरोपीला अंतरिम जामीन मिळाला असल्याचा आरोप पीडित युवतीने पत्रकार परिषद दरम्यान केला