औरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा

औरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. औरंगाबाद महापालिकेतील नगरसेवक सय्यद मतीनने एका महिलेला नोकरीचं आमिष दाखवून बलात्कार केला असा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत महिला दोन मुलांची माता आहे. पीडितेला पतीने सोडून दिल्याने ती आईसोबत राहते. वर्षभरापूर्वी आधार कार्ड तयार करून घेण्यासाठी गेली असता मतीनने नोकरी मिळवून देतो. लग्न करतो, असे आमिष दाखवून तिच्याशी जवळीक निर्माण केली. नंतर रशीदपुरा, टाऊन हॉल येथे एका घरात तिच्यावर बलात्कार केला.

यानंतर, घटनेची वाच्यता कोठेही केल्यास जिवे मारेन, अशी धमकीदेखील दिल्याचे महिलेने पोलिसांनी सांगितले. मतीनने लग्नास नकार दिल्यानंतर महिलेने याबाबत पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिका-यांची भेट घेऊन मतीनविरुद्ध तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी मतीनविरुद्ध रीतसर कारवाई करण्याचे आदेश सिटी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब शिंगारे यांना दिले. मंगळवारी (15 जानेवारी) रात्री अखेर महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सय्यद मतीन सय्यद रशीदविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू असताना नगरसेवक मतीन बेपत्ता झाला असून, त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या :